---Advertisement---

कोलकाता, मुंबई की पंजाब, कोण ठरणार प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ? पाहा कसे आहे समीकरण

On: गुरूवार, ऑक्टोबर 7, 2021 5:00 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आली आहे. या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. चौथ्या संघासाठी अजूनही मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. अशात गुरुवारी(७ ऑक्टोबर) राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यावरुन प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा संघ कोणता असू शकतो, हे स्पष्ट होऊ शकते.

आयपीएल २०२१ स्पर्धेच्या गुणतालिकेबद्दल बोलायचं झालं तर, सर्व संघांनी आतापर्यंत एकूण १३-१३ सामने खेळले आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघ २० गुणांसह पहिल्या स्थानी तर चेन्नई सुपर किंग्स संघ १८ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ या यादीत १६ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.

तसेच चौथे स्थान मिळवण्यासाठी कोलकाता नाईट आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांना प्रबळ दावेदार मानले जात आहे. कारण दोघांचे ही प्रत्येकी १२-१२ गुण आहेत. तर पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स संघ १०-१० गुणांच्या बरोबरीत आहे. तसेच सनरायझर्स हैदराबाद संघ ६ गुणांसह सर्वात शेवटी आहे.

गुरुवारी (७ ऑक्टोबर) आयपीएल स्पर्धेत दोन सामने पार पडणार आहेत. पहिल्या सामन्यात चेन्नई आणि पंजाब आमने-सामने असणार आहेत. तर दुसऱ्या सामन्यात कोलकाता आणि राजस्थान संघ आमने-सामने असणार आहे. जर या सामन्यात कोलकाता संघाला विजय मिळवण्यात यश आले तर, हा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याचा प्रबळ दावेदार असेल.

परंतु, कोलकाताच्या विजय होऊन देखील मुंबईला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी असणार आहे. जर कोलकाताच्या विजय होऊन मुंबईला प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल तर, हैदराबाद विरुद्ध सामन्यात ७० किंवा त्यापेक्षा अधिक धावांनी पराभूत करावे लागेल किंवा १० षटकात दिलेले आव्हान पूर्ण करावे लागेल.

दुसरीकडे, जर राजस्थानने कोलकाताला पराभूत केले, तर मुंबईचा मार्ग आणखी सोपा होऊन जाईल. असे झाले तर, मुंबईला हैदराबाद विरुद्ध होणाऱ्या सामन्यात फक्त विजय मिळवावा लागणार आहे. तसेच जर राजस्थान संघाला विजय मिळवण्यात यश आले तर पंजाब संघाला देखील प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळेल. परंतु, यासाठी त्यांना मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. इतकेच नव्हे तर, मुंबई आणि कोलकाता संघ मोठ्या फरकाने पराभूत झाला पाहिजे, याची प्रार्थना देखील करावी लागेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

फळं-भाज्या विक्रेत्याच्या मुलाने टाकला आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू, वाचा उमरानच्या वडिलांनी दिलेली प्रतिक्रिया

पाकिस्तान संघाचे प्रशिक्षकपद का नाकारले? वसीम अक्रम म्हणाले, ‘मी मूर्ख नाही…’

आयपीएलमधील फ्लॉप प्रदर्शनानंतरही ऑस्ट्रेलियन कर्णधाराची वॉर्नरला साथ, टी२० विश्वचषकात खेळवण्याचा दिला शब्द

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---