---Advertisement---

नादच खुळा! उमरानच्या वेगापुढे बांगलादेशचा शांतोही झाला शांत, वेग होता ताशी 151 किमी

Umran-Malik
---Advertisement---

भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक हा वेळोवेळी स्वत:ला सिद्ध करत आहे. आयपीएलमध्ये आपल्या गोलंदाजीने फलंदाजांच्या दांड्या उडवल्यानंतर तो आता बांगलादेशच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणत आहे. जम्मू काश्मीरच्या उमरानने आयपीएल 2022मध्ये दमदार गोलंदाजी करत भारताच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवले होते. आता मंगळवारी (दि. 07 डिसेंबर) दुसऱ्या वनडेत या युवा भारतीय वेगवान गोलंदाजाचा जलवा पाहायला मिळाला. उमरान मलिकने ताशी 151 किमीच्या गतीने गोलंदाजी केली आणि बांगलादेशच्या फलंदाजाचा त्रिफळा उडवला. यादरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

या सामन्यात 23 वर्षीय उमरान मलिक (Umran Malik) याने त्याच्या पहिल्याच षटकात गोलंदाजीने अनुभवी फलंदाज शाकिब अल हसन याला चांगलाच त्रास दिला. त्याने एकापाठोपाठ एक अशा बाऊंसर्सचा मारा केला. त्याच्याविरुद्ध धावा काढल्या गेल्या नाहीत. पॉवरप्ले संपताच प्रभारी कर्णधार केएल राहुल याने त्याला गोलंदाजी करण्यास सांगितले होते. मलिकने शाकिबला निर्धाव षटकाने आपल्या गोलंदाजीची सुरुवात केली. आपल्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर उमरानने नजमुल हुसेन शांतो (Najmul Hossain Shanto) याचा त्रिफळा उडवला. नजमुल शांतोकडे उमरानच्या चेंडूचे कोणतेही उत्तर नव्हते. कारण, त्याने पहिल्याच चेंडूवर आपली विकेट गमावली होती.

शाकिबच्या चिंतेत वाढ
पुढे 12व्या षटकात उमरानने शाकिबला चिंतेत टाकले. त्याचा दुसरा चेंडू खेळाडूच्या पाठीवर जाऊन लागला. शाकिब बाऊंसरपासून वाचण्याचा प्रयत्न करत होता, परंतु चेंडूला खेळपट्टीवर उसळी मिळाली नाही. मात्र, त्याने आधीच बचावात्मक खेळी केली. शाकिब बॉल डक करण्यासाठी खाली बसला होता, अशात चेंडू त्याच्या पाठीवर जाऊन लागला.

https://twitter.com/Shiva01186823/status/1600398860219691008

षटकाचा शेवटचा चेंडूही खतरनाक होता. यावेळीही शाकिब वाचण्यासाठी खाली बसणार होता, पण चेंडू थेट त्याच्या हेल्मेटवर जाऊन लागला.

भारतीय संघाला या सामन्यात विजयासाठी बांगलादेशकडून 272 धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान पार करून भारतीय संघ मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. (umran malik knocks over najmul hossain shanto stump by 151 kph delivery video viral)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाद करा पण आमचा कुठं! भारतीय गोलंदाजांना चोप देत मेहिदी हसनचे शतक, नावावर खास विक्रमाची नोंद
उमरानचा बॉल गोळीसारखा आला अन् शाकिबचं हेल्मेट तोडून गेला, व्हिडिओ पाहून व्हाल हैराण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---