इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) वेगवान गोलंदाजी करणाऱ्या उमरान मलिक (Umran Malik) याने त्याच्या जलद गतीने सगळ्यांना भूरळ घातली आहे. यावरून त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघात वर्णी लागली. पाच सामन्यांच्या त्या टी२० मालिकेत तो सर्व सामने बाकावरच बसून होता. आता त्याची आयर्लंड दौऱ्यासाठी ही संघात निवड करण्यात आली आहे. दोन सामन्यांच्या या टी२० मालिकेत तो खेळणार की त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी अजून वाट पाहावी लागणार का हे लवकरच कळणार आहे. त्याच्याबाबत महत्वाचे विधान भारताच्या माजी कर्णधाराने क्रिकेटपटूने केले आहे.
भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांच्या मते, जम्मू कश्मिरच्या या युवा खेळाडूचे यावर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी संघात निवड व्हायला हवी. “तो एक उत्तम गोलंदाज असून त्याने आयपीएलमध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्याला एक संधी द्यावी. तो ऑस्ट्रेलियाे विमान पकडणार याची मला मला पूर्ण खात्री आहे,” असे वेंगसरकर म्हणाले आहेत.
यावर्षीचा टी२० विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात खेळला जाणार आहे. “उमरानने आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजी तर केलीच याचबरोबर त्याने २२ विकेट्सही घेतल्या आहेत. तो एक युवा खेळाडू असून लयीमध्ये असलेल्या खेळाडूंना संधी द्यावी,” असेही वेंगसरकरांनी म्हटले आहे.
“विराट हा एक उत्तम आंतरराष्ट्रीय फलंदाज आहे. त्याची फिटनेस कमालीची असून त्याच्यात चांगले पुनरागमन करण्याची ताकद आहे. इंग्लंमध्ये त्याचे प्रदर्शन विशेष ठरणार आहे,” असे म्हणत वेंगसरकरांनी विराट कोहलीच्या कामगिरी बाबतही चर्चा केली आहे.
वेंगसरकर यांचे संघ सहकारी आणि १९८३च्या विश्वविजेत्या संघाचा एक भाग असलेल्या रॉजर बिन्नी यांंनीही उमरानला एक संधी द्यायला हवी असे मत मांडले आहे.
भारतीय संघ आयर्लंडच्या दौऱ्यात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ डबलिन येथे २६ जूनला पहिला आणि २८ जूनला दुसरा टी२० सामना खेळणार आहे. टी२० विश्वचषकाची पूर्वतयारी या दृष्टीने ही मालिका भारतीय संघासाठी महत्वाची ठरणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IRE vs IND | पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय धुरंधर बनवू शकतात ‘हे’ पाच महत्वाचे विक्रम
ज्या मैदानावर आलं अपयश तिथेच मिळवलं अविस्मरणीय यश; चंद्रकांत पंडितांना अश्रू अनावर
इंग्लंड दौऱ्यावर कर्णधारपदाचा दावेदार बुमराहला विराटचा चोप, व्हिडिओ तुफान व्हायरल