मुंबई। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात रविवारी (२२ मे) साखळी फेरीतील अखेरचा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स संघात हा सामना झाला. या सामन्यात पंजाबने ५ विकेट्सने विजय मिळवला. पण असे असले तरी, या सामन्यात पंजाबचा कर्णधार मयंक अगरवाल याला मोठा धक्का बसला. तो उमरान मलिकच्या गोलंदाजीवर दुखापतग्रस्त झाला.
या सामन्यात (Sunrisers Hyderabad vs Punjab Kings) सनरायझर्स हैदराबादने २० षटकात ८ बाद १५७ धावा करत पंजाब किंग्ससमोर १५८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबकडून कर्णधार मयंक अगरवाल (Mayank Agarwal) शाहरुख खान बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजासाठी आला.
पण, तो फलंदाजीला आल्यानंतर लगेचच दुखापतग्रस्त झाला. झाले असे की, डावाच्या सातव्या षटकात उमरान मलिक (Umran Malik) गोलंदाजीला आला. त्याने या टाकलेल्या या षटकातील वेगवान चौथा चेंडू मयंकच्या छातीला (Umran Malik’s delivery hit Mayank Agarwal in the ribs) लागला. त्यामुळे मयंक वेदनेने कळवळायला लागला आणि मैदानावरच झोपला.
https://twitter.com/credbounty/status/1528417714242408448
त्यामुळे पंजाब संघाचे फिजिओ आणि डॉक्टर आले. त्यांनी त्याच्यावर उपचार केले. यावेळी अन्य खेळाडूंनीही त्याची चौकशी केली. त्यामुळे काहीवेळासाठी सामना देखील थांबला होता. पण नंतर मयंकने खेळण्यास सुरूवात केली. पण तो फार काळ टिकू शकला नाही. मंयकला ८ व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने एक धावेवर बाद केले.
https://twitter.com/jemi_forlife/status/1528416124668620800
Mayank Agarwal gets hit flush in the ribs by Umran Malik!
Could leave a mark.. if not a broken rib!#SRHvPBKS | #PBKSvSRH | #IPL | #IPL2022 pic.twitter.com/SAgNXwvk4a
— 🏏Flashscore Cricket Commentators (@FlashCric) May 22, 2022
दरम्यान, मयंक आणि उमरान यांच्यात सामन्याच्या पहिल्या डावात शाब्दिक युद्ध झाल्याचे पाहायला मिळाले होते. याबद्दल सामन्यानंतर मंयक म्हणाला की, ‘मी त्याला विचारले होते की, त्याने सर्व संरक्षणात्मक गोष्टी घातल्या आहेत ना नाहीतर, दुखापत होईल.’ तसेच मंयकने दुखापतीबद्दल सांगितले की, ‘बरगड्यांना सुज आली आहे, आता एक्सरे काढण्यासाठी जाणार आहे.’ पण, अद्याप मयंकची दुखापत किती गंभीर आहे याबद्दल माहिती मिळालेली नाही.
दरम्यान सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास पंजाबकडून लियाम लिव्हिंगस्टोनने २२ चेंडूत नाबाद ४९ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. पंजाबने १५८ धावांचे आव्हाव १५.१ षटकात पूर्ण केले. गोलंदाजीत पंजाबकडून हरप्रीत ब्रार आणि नॅथन ऍलिस यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
‘जर स्वत:वर विश्वास ठेवला, तर…’, टीम इंडियात निवड होताच दिनेश कार्तिकने केली मनाला भिडणारी पोस्ट
लिव्हिंगस्टोनचा षटकार ठरला ऐतिहासिक! १५ वर्षांच्या आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच झाला ‘हा’ पराक्रम
गोष्ट त्या क्रिकेटरची, ज्याची प्रतिभा अक्षरक्ष: बाळासाहेब ठाकरेंना मैदानावर येण्यास भाग पाडायची