मुंबई । यावर्षी इंडियन प्रीमियर लीगचे शीर्षक प्रायोजक (टायटल स्पॉन्सर्स) होण्यासाठी टाटा समूहाने ‘एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट’ (ईओआय) जमा केले आहे, तर शिक्षण तंत्रज्ञान कंपनी ‘अनऍकेडमी’ आणि फँटॅसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म ‘ड्रीम 11’ देखील यावर्षी चिनी मोबाइल कंपनी विवोची जागा घेण्यास इच्छुक आहेत.
भारतीय क्रिकेट बोर्डाकडे (बीसीसीआय) ईओआय सादर करण्याची शेवटची तारीख शुक्रवारपर्यंत होती. यावर्षी 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल युएईमध्ये होईल. टाटा समूहाच्या आगमनानंतर मुख्य प्रायोजकत्व मिळविण्यासाठी स्पर्धा वाढली आहे.
बीसीसीआयची आशा आहे की, बोली विवोच्या वार्षिक 440 कोटी रुपयांच्या करारापेक्षा कमी नसेल.
कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, “होय, टाटा समूहाने आयपीएलचे प्रायोजक होण्यासाठी ईओआय सादर केला आहे.”
बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्रांनी याआधी पीटीआयला सांगितले होते की, ‘अनअकॅडमी आणि ड्रीम 11 ने आयपीएलचे शीर्षक प्रायोजकत्व अधिकार संपादन करण्यासाठी ईओआय दिले आहे. ईओआय बोलीच्या रकमेचा उल्लेख करीत नाही. ते 18 ऑगस्टला पाठविला जाईल.’
बीसीसीआयने आधीपासूनच स्पष्ट केले आहे की, मोठी बोली लावणाऱ्या कंपनीला आयपीएलचे प्रायोजक दिले जाईल असेच नाही, तर त्यासाठी सर्व नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. योगगुरू बाबा रामदेवची पतंजली आणि जिओ कम्युनिकेशन्सही शीर्षक प्रायोजकत्वासाठी रेसमध्ये आहेत, अशी चर्चा आहे, परंतु बीसीसीआयने अद्याप याची स्पष्ट माहिती दिली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ‘या’ अष्टपैलू खेळाडूची पत्नी आहे मेकअप आर्टिस्ट
आयपीएलदरम्यान खेळाडूला कोरोना झाल्यास स्पर्धा होणार रद्द? जाणून घ्या काय आहे नियम
‘कॅप्टन कूल’ धोनीचा स्वॅग पाहिलाय का?, आलिशान गाडीतून पोहोचला एअरपोर्टवर
ट्रेंडिंग लेख –
कसोटी क्रिकेटमध्ये येत्या काळात ६०० विकेट्सचा टप्पा गाठू शकतील असे ३ गोलंदाज
धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला धू धू धुणारा क्रिकेटर आज कुणाला आठवतही नाही
किस्से क्रिकेटचे १३- भारत इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवत होता, कर्णधार मात्र आराम खुर्चीत…