मुंबई । इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) साठी निवडले गेलेले इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू स्पर्धेच्या पहिल्या आठवड्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. 4 ते 16 सप्टेंबर दरम्यान दोन्ही देशांमध्ये मर्यादीत षटकांच्या मालिका खेळले जातील. हे सामने साऊथॅम्प्टन आणि मँचेस्टर येथे खेळले जाणार आहेत. ऑस्ट्रेलिया 4, 6 आणि 8 सप्टेंबर रोजी एजिस बाऊलमध्ये इंग्लंडविरुद्ध तीन टी20 सामने खेळणार आहे. तर 11, 13 आणि 16 सप्टेंबरला ओल्ड ट्रॅफर्ड येथे तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाईल.
या मालिकेत खेळणारे आयपीएल खेळाडू 17 किंवा 18 सप्टेंबरला युएईला पोहोचू शकतात. त्यांना आयपीएलच्या एसओपीनुसार सहा दिवस वेगळे रहावे लागेल. या दरम्यान, त्यांना कोविड -१९ची आरटी-पीसीआर चाचणी पहिल्या, तिसर्या आणि सहाव्या दिवशी करावी लागेल. तिन्ही तपासात निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर त्यांना जैविक दृष्ट्या सुरक्षित वातावरणात येऊ दिले जाईल. याचा अर्थ असा की, कोणताही खेळाडू कमीतकमी पहिल्या दोन किंवा तीन सामन्यांसाठी त्यांच्या संबंधित फ्रेंचायझीसाठी उपलब्ध होणार नाही.
इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचे एकूण 29 खेळाडू आयपीएलचा भाग आहेत. डेव्हिड वॉर्नर, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, स्टीव्ह स्मिथ आणि पॅट कमिन्स, ओएन मॉर्गन हे इंग्लंड-ऑस्ट्रलियाचे प्रमुख खेळाडू आयपीएलच्या संघात खेळणार आहेत.
या खेळाडूंच्या अनुपस्थितीचा फटका सर्वात जास्त राजस्थान रॉयल्सला होऊ शकतो. कारण त्यांना बटलर, स्टोक्स, स्मिथ आणि आर्चरसारख्या खेळाडूंशिवाय काही सामने खेळावे लागतील. त्यातही स्मिथ राजस्थानचा कर्णधार आहे. तसेच सनरायझर्स हैद्राबादलाही डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअस्टोची अनुपस्थिती भासू शकते. वॉर्नर हैद्राबादचा कर्णधार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलचे प्रायोजक होण्यासाठी आणखी दोन कंपन्यांनी दाखवला इंटरेस्ट
किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ‘या’ अष्टपैलू खेळाडूची पत्नी आहे मेकअप आर्टिस्ट
आयपीएलदरम्यान खेळाडूला कोरोना झाल्यास स्पर्धा होणार रद्द? जाणून घ्या काय आहे नियम
ट्रेंडिंग लेख –
कसोटी क्रिकेटमध्ये येत्या काळात ६०० विकेट्सचा टप्पा गाठू शकतील असे ३ गोलंदाज
किस्से क्रिकेटचे १३- भारत इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवत होता, कर्णधार मात्र आराम खुर्चीत…