क्रिडा जगतात रोजरोज कोणत्या खेळात नवनवीन विक्रम होत असतील, तर अर्थातच क्रिकेटमध्येच. टेस्ट, वनडे किंवा टी२० अशा तीन प्रकारात क्रिकेट होत असल्यानं, कधी बॅटर, कधी बॉलर, कधी फिल्डर, कधी अंपायर एवढंच नाही, तर प्रेक्षकही कधीकधी क्रिकेटमध्ये रेकॉर्ड बनवतात. यातील काही रेकॉर्ड हे हवेहवेसे वाटणारे असतात, तर काही नकोसे. काही रेकॉर्ड हे या दोनही प्रकारातील नसून, एका वेगळ्याच प्रकारातील असतात. सध्या त्यांना आपण विचित्र विक्रम म्हणू. आज आपण क्रिकेट इतिहासातील अशाच विचित्र विक्रमांबद्दल माहिती करून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया…
गॅरी सोबर्स
विचित्र विक्रमांच्या या लिस्टमध्ये पहिलंच नाव आहे सर गॅरी सोबर्स यांचं. वर्ल्ड क्रिकेटन पाहिलेला हा पहिला ग्रेटेस्ट ऑल राऊंडर. वेस्ट इंडीजसाठी ९३ टेस्ट खेळणाऱ्या सोबर्स यांनी विक्रमांचे अनेक इमले रचले, पण हेच सोबर्स आपल्या करिअरमध्ये फक्त एक वनडे खेळलेत, हे तुम्हाला माहीत आहे का? विशेष म्हणजे या एका वनडेतच त्यांच्या नावे विचित्र विक्रम जमा झाला. सोबर्स या एकमेव वनडेत शून्यावर आऊट झाले. त्यांना आउट करणारा होता ख्रिस ओल्ड. बॉलिंग करताना सोबर्स यांना एकच विकेट मिळाली आणि ती होती ख्रिस ओल्डचीच.
हेही पाहा- क्रिकेट जगतातील ५ विक्रम जे तुम्ही कधी ऐकलेही नसतील
मुथय्या मुरलीधरन
मुथय्या मुरलीधरन किती बाप बॉलर होता हे आकड्यांवरून आणि त्याच्या ग्राउंडवरील परफॉर्मन्सवरून आपण पाहिलेय. टेस्ट आणि वनडेत मिळून हजारपेक्षा जास्त विकेट त्याच्या नावावर आहेत, पण याच मुरलीच्या नावे वनडेत एक विचित्र विक्रम जमा आहे. जगात २१ क्रिकेटर्सने ३०० प्लस वनडे खेळले. त्यात मुरली, चामिंडा वास आणि वसीम अक्रम हे तीनच बॉलर. त्यातही मुरली एकटाच असा ज्याला वनडेत हजार रन्स करता आले नाही. ६७४ रन्स करताना तो ६४ वेळा नॉट आउट राहिला. हादेखील एक विक्रमच.
कुमार संगकारा
श्रीलंकेचा कुमार संगकारा म्हणजे जगातील ऑल टाईम ग्रेट विकेटकिपर बॅटर. त्याचं ४०४ वनडेच लांबलचक करियर. ३०० वनडे खेळणाऱ्या क्रिकेटर्समध्ये संगकाराचा नंबर लागतो, पण एवढं असूनही त्याच्या नावावर एक विचित्र विक्रम जमा झालाच. इतक्या साऱ्या मॅचेस खेळून एकही विकेट न मिळणारा तो एकटाच. धोनी, पॉंटिंग, जयवर्धने, इंजमाम यांनीही विकेट घेतल्या, पण संघाने कधीही कीपिंग ग्लोव्हज काढले नाहीत.
मार्क बाउचर
तुम्हाला जगातील आजवरच्या टॉप विकेटकीपर्सची लिस्ट काढायला लावली तर, तुम्ही डोळे झाकून कुमार संगकारा, एमएस धोनी, ॲडम गिलख्रिस्ट मार्क बाऊचर ही नावे घेताल. या साऱ्यांनी २८० पेक्षा जास्त वनडे खेळले आणि किपिंग करताना ३०० प्लस विकेट घेतले, पण तुम्हाला माहित आहे का या सर्वांच्या नावावर एक विचित्र विक्रम जमा आहे. या सर्वांनीच कधी ना कधी आऊट फिल्डमध्ये फिल्डिंग केली, पण त्यांना कधीच एकही कॅच घेता आला नाही.
राहुल द्रविड
इंडियन क्रिकेटची भिंत म्हणजे राहुल द्रविड. आपल्या डिफेन्स पुढे जगातील साऱ्याच बॉलर्सना हतबल करणारा द्रविडही विचित्र विक्रमांच्या या यादीत सामील आहे. १६४ टेस्ट खेळताना द्रविडने ३१ हजारांपेक्षा जास्त बॉलचा सामना केलेला. एवढे असूनही, सर्वाधिक वेळा क्लीन बोल्ड द्रविडच झालाय. तेही तब्बल ५५ वेळा. इतका तगडा डिफेन्स असणाऱ्या बॅटरसाठी हा विचित्र रेकॉर्ड म्हणावा नाही तर काय?
शाहिद आफ्रिदी
पाकिस्तानचा मॉडर्न ग्रेट शाहिद आफ्रिदी आपल्या ऑलराऊंड एबिलिटीसाठी ओळखला जायचा. बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये त्याचे योगदान असायचे. याच आफ्रिदीबाबत एक विचित्र विक्रम असा आहे की, ८००० पेक्षा जास्त इंटरनॅशनल रन बनवणारा आफ्रिदी, पूर्ण करियरमध्ये कधीही १०० बॉल खेळला नाही. आफ्रिदी सारख्याला हे शोभतं का?
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शारीरिक व्यंगावर मात करत ‘हे’ ५ क्रिकेटर्स बनले दिग्गज, टीम इंडियाच्या २ खेळाडूंचा समावेश