---Advertisement---

तब्बल १४४ वर्षांच्या इतिहासात केवळ भज्जीनेच केलाय हा विक्रम; १० वर्षात कोणी पोहचले नाही आसपास

On: मंगळवार, डिसेंबर 28, 2021 12:19 AM
harbhajan
---Advertisement---

भारतीय संघाचा दिग्गज गोलंदाज हरभजन सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. तब्बल २३ वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीनंतर त्याने अखेर निवृत्ती जाहीर केली आहे. या निर्णयानंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अनेकांनी त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याने आपल्या कारकीर्दीत अनेक मोठ मोठे विक्रम केले. परंतु एक विक्रम असाही आहे जो १४४ वर्षांच्या क्रिकेट इतिहासात त्यालाच जमला आहे. तसेच हा विक्रम येणाऱ्या काही वर्षातही तुटण्याची शक्यता खूप कमी आहे. कुठला आहे तो विक्रम? चला जाणून घेऊया. (Harbhajan Singh retired)

हा विक्रम हरभजन सिंगने २०१० मध्ये न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान केला होता. या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात हरभजन सिंगने पहिल्या डावात ६९ तर दुसऱ्या डावात ११५ धावांची खेळी केली होती. ज्यामुळे हा सामना अनिर्णीत राहिला होता.

 

तर मालिकेतील दुसरा कसोटी सामना १२ ते १६ नोव्हेंबर दरम्यान हैदराबादमध्ये पार पडला होता. या सामन्यात देखील हरभजन सिंगचा जलवा पाहायला मिळाला होता. त्याने या सामन्यातील पहिल्या डावात ११६ चेंडूंमध्ये १११ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ७ चौकार आणि ७ षटकार मारले होते.(Unbreakable record of harbhajan singh)

हरभजन सिंगने अनेक दिग्गज फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आहे. परंतु या मालिकेत तो न्यूझीलंड संघातील गोलंदाजांवर तुटुन पडला होता. दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकावताच तो आठव्या क्रमांकावर सलग २ शतक झळकावणारा पहिलाच फलंदाज ठरला होता. २०१० नंतर असा कारनामा कुठल्याही खेळाडूला करता आला नाहीये. १० वर्ष उलटून गेली तरी या विक्रमाच्या जवळपासही कोणी पोहचू शकलेल नाहीये.  कुठलाही फलंदाज हा विक्रम मोडून काढेल याची शक्यता देखील खूप कमीच आहे.

महत्वाच्या बातम्या :

शतक एक विक्रम अनेक!! केएल राहुलने शतकी खेळीसह केले ‘हे’ विक्रम नावावर; सचिन-कोहलीच्या पंक्तीत स्थान

वेदनादायक सुरुवात! बॉक्सिंग डे कसोटीत पुजारा शुन्यावर बाद; ‘हा’ नकोसा विक्रमही केलाय नावावर

हा व्हिडिओ नक्की पाहा :

विरोधी संघातील गोलंदाजांना Golden Watches भेट देणारा Captain|क्रिकेटर कमी राजकारणी जास्त असलेला Vizi

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---