---Advertisement---

नाशिक येथे १९ वर्षाखालील शालेय कबड्डी स्पर्धा आजपासून, जाणून घ्या आज होणाऱ्या सामन्यांबद्दल…

On: मंगळवार, ऑक्टोबर 15, 2019 6:33 PM
---Advertisement---

१९ वर्षाखालील मुले/मुली राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा २०१९-२० क्रीडा व युवकसेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद, नाशिक यांच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे. यंदा स्व. खाजदर डॉ. वसंतराव पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ ही स्पर्धा नाशिक जिल्हा परिषद घेत आहे.

मराठा विद्याप्रसारक समाजाचे के. टी. एच. एम. महाविद्यालय, नाशिक येथे ही स्पर्धा होणार आहे. आज दिनांक १५ ऑक्टोबर पासून स्पर्धेला सुरुवात होईल. तर १६ ऑक्टोबर रोजी उपांत्य फेरी व अंतिम फेरीचे सामने पार पडतील. तसेच त्यानंतर निवड चाचणी घेण्यात येईल.

सदर स्पर्धेत महाराष्ट्रातील ८ विभागातील विभागीय स्पर्धेतील विजेते संघ स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. कोल्हापूर, लातूर, अमरावती, मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे व औरंगाबाद असे ८ विभागातील मुलांचे ८ व मुलींचे ८ संघानी भाग घेतला आहे.

स्पर्धेसाठी दोन मॅटची मैदाने तयार करण्यात आली असून प्रेक्षकांना बसण्यासाठी भव्य प्रेक्षक गॅलरी तयार करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा परिषदेकडून स्पर्धेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

आज होणारे सामने-

मुले:-

१) कोल्हापूर विभाग विरुद्ध लातूर विभाग

२) अमरावती विभाग विरुद्ध मुंबई विभाग

३) नाशिक विभाग विरुद्ध नागपूर विभाग

४) पुणे विभाग विरुद्ध औरंगाबाद विभाग

मुली:-

१) पुणे विभाग विरुद्ध अमरावती विभाग

२) कोल्हापूर विभाग विरुद्ध लातूर विभाग

३) नाशिक विभाग विरुद्ध नागपूर विभाग

४) मुंबई विभाग विरुद्ध औरंगाबाद विभाग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---