पाऊस, वादळ किंवा कमी सूर्यप्रकाशामुळे कोणत्या क्रिकेट सामन्यात व्यत्यय आल्याचे अनेकांनी पाहिले आणि ऐकले आहे. पण एखाद्या लाईव्ह सामन्यात चक्क भूकंप (Earthquake In Cricket Macth) आल्याची घटना दुर्मिळच. मात्र वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकातील (U19 World Cup) एका सामन्यादरम्यान प्रत्यक्षात ही घटना घडली आहे. झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड (Zimbabwe vs Ireland) यांच्यात पोर्ट ऑफ स्पेनमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान भूकंपाची स्थिती उद्भवली होती. यामुळे स्टेडियममधील कॅमेरेही हालताना दिसले. परंतु खेळावर याचा कसलाही परिणाम झाला नाही. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
शनिवारी (२० जानेवारी) पोर्ट ऑफ स्पेन (Port Of Spain) येथे आयर्लंड विरुद्ध झिम्बाब्वे संघांमध्ये प्लेट उपांत्य फेरीचा दुसरा सामना पार पडला. या सामन्यात झिम्बाब्वेचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी आला होता. त्यांचा डाव सुरू असतानाच भूकंपाचा झटका जाणवला. ही घटना झिम्बाब्वेच्या डावातील सहाव्या षटकात घडली. आयर्लंडचा फिरकीपटू मॅथ्यू हम्फ्रे हे षटक टाकत होता. त्याच्या षटकातील पाचवा चेंडू सुरू असताना अचानक भुकंपाच्या झटक्यामुळे मैदान हादरू लागले.
व्हिडिओ पाहा- काय घडलं होतं भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये
मैदानासहित सामन्याचे लाईव्ह ब्रॉडकास्ट करण्यासाठी मैदानावरील समोरच्या बाजूला लावलेला कॅमेरालाही हालू लागला. जवळपास २० सेकंद भूकंपाचे झटके जाणवले. हा सर्व प्रसंग कॅमेरात कैद झाला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
असे असले तरीही, खेळाडूंना मात्र भूकंपाच्या झटक्याची चाहूलही लागली नाही आणि ते सामना खेळत राहिले. झिम्बाब्वेच्या फलंदाज ब्रायन बॅनेटने पाचवा चेंडू मिड ऑफच्या दिशेने मारला आणि पुढील सहाव्या चेंडूवर चौकार मारत षटक संपवले.
Earthquake at Queen's Park Oval during U19 World Cup match between @cricketireland and @ZimCricketv! Ground shook for approximately 20 seconds during sixth over of play. @CricketBadge and @NikUttam just roll with it like a duck to water! pic.twitter.com/kiWCzhewro
— Peter Della Penna (@PeterDellaPenna) January 29, 2022
कॉमेंट्री बॉक्समध्येही जाणवले भूकंपाचे झटके
भलेही झिम्बाब्वे आणि आयर्लंडच्या खेळाडूंना भूकंपांचे झटके जाणवले नाहीत. परंति सामन्याचे समालोचन करत असलेल्या समालोचकांना मात्र त्याची जाणीव झाली. आयसीसीचे समालोचक एंड्य्रू लियोनार्डने भूकंपाच्या झटकाविषयी बोलताना म्हटले की, मला विश्वास आहे की, आता भूकंप आला आहे. कॉमेंट्री बॉक्समध्येही याचे झटके जाणवले. असे वाटले, जणू आमच्या मागून फक्त कोणती रेल्वे चालली आहे. तर पूर्ण क्विन्स पार्क ओव्हल मीडिया सेंटर हालत आहे.
👉 You may have heard chatter on the commentary today about an earthquake at the Under-19s World Cup match between Ireland and Zimbabwe.
That wasn’t just the effects from #theBlarneyArmy at the ground celebrating a wicket, it was a 5.1 magnitude quake just off Trinidad’s coast! pic.twitter.com/0PISiyqdaN
— Cricket Ireland (@cricketireland) January 29, 2022
आयर्लंड क्रिकेटने केली भूकंपाची पुष्टी
आयर्लंड क्रिकेटने ट्वीट करत पोर्ट ऑफ स्पेनमधील भूकंपाची पुष्टी केली आहे. त्रिनिदादच्या समुद्रकिनाही ५.२ तिव्रतेचा भूकंप आला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्या’दिवशी चेन्नईमधील चेपॉक मैदानात सेहवागने वॉर्नची अक्षरशः पिसे काढली
रवी कुमारच्या जादुई चेंडूने फलंदाजही बुचकळ्यात, काही कळायच्या आतच उडून पडल्या दांड्या- VIDEO
एक अविस्मणीय क्रिकेट सामना! ४५ धावांवर बाद होऊनही इंग्लंडने मिळवला होता शानदार कसोटी विजय
हेही पाहा-