---Advertisement---

बांग्लादेश विरुद्ध आयसीसी राडा सुरूच! आता कोणी घेतला पंगा, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

On: बुधवार, जानेवारी 28, 2026 4:10 PM
---Advertisement---

पुरूषांच्या टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेबाबत बांग्लादेश आणि आंतररराष्ट्रीय क्रिकेट संघटना (आयसीसी) यांच्यात अनेक मतभेद झाले होते. शेवटी बांग्लादेशने या स्पर्धेतून माघार घेतली. आता बांग्लादेशने आयसीसीवर मोठा आरोप लावला आहे. यावेळी वरिष्ठ नाहीतर १९ वर्षाखालील संघाने चालू विश्वचषक स्पर्धेबद्दल हे प्रकरण आहे. ही स्पर्धा झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये सुरू आहे.

बांग्लादेश विरुद्ध इंग्लंड सामन्यात बांग्लादेश पराभूत झाला आणि ते उपांत्य फेरीतून बाहेर झाले. यामुळे आयसीसीवर त्यांनी त्यांच्या वेळापत्रकाबाबत विचारणा केली आहे. या स्पर्धेतून बांग्लादेश बाहेर झाला आहे.

या स्पर्धेत बांग्लादेशने चार सामने खेळले असून त्यातील केवळ एकच सामना त्यांना जिंकता आला. तसेच त्यांनी दोन सामने गमावले तर एक सामना पावसामुळे वाया गेला. यावरून त्यांची या स्पर्धेतून बाहेर जाण्याचे कारण त्यांची कामगिरी होती, असे दिसून येते मात्र पावसामुळे प्रभावित झालेले सामने त्याला जबाबदार आहेत. यामुळे त्यांच्या अधिकाऱ्यांनी संघाच्या प्रवासाबाबत प्रश्न निर्माण केले.

बांग्लादेशचे गेम डेव्हलपमेंट समन्वयक (कोऑर्डिनेटर) हबीबुल बशर म्हणाले, “भारत आणि इंग्लंडविरुद्ध आमच्या धावसंख्या कमी झाल्या, आमचा प्रवासच त्याला कारणीभूत आहे. सर्वांना हे पटणार नाही, मात्र हेच खरे आहे.” आयसीसीने विमानाने प्रवास करण्यावर बंदी आणली होती. त्यामुळे सर्वांना बसने प्रवास करणे आवश्यक होते. कोणते स्टेडियम ४ तास दूर असेल, तर ९ ते १० तास बसप्रवास करावा लागे.

बांग्लादेश क्रिकेट बोर्डने (बीसीबी) सराव सामन्यानंतर स्वत: खर्च करत भारत आणि इंग्लंड विरुद्धच्या सामन्यांसाठी खेळाडूंना विमानाने नेले होते. ६ जानेवारीला बांग्लादेश झिम्बाब्वेमध्ये पोहोचला आणि १० आणि १३ जानेवारीला दोन वॉर्म अप सामने खेळले. त्यातील एक सामना मासविंगोत तर दुसरा सामना हरारेमध्ये होता. दोन्ही शहरामध्ये ४ तासांचे अंतर होते. त्यानंतर बांग्लादेशला हरारेमधून बुलवायोला जायचे होते. त्याच्यासाठी ९ तास बसचा प्रवास करावा लागला.

या स्पर्धेत बांग्लादेशाला १७ जानेवारीला भारत आणि २० जानेवारीला न्यूझीलंड विरुद्ध सामने खेळायचे होते. या दोन्ही सामन्यांसाठी संघाने विमानप्रवास केला, मात्र दोन्ही सामन्यात पाऊस शत्रू ठरला. भारताविरुद्ध सामना गमावला, तर न्यूझीलंडविरुद्ध सामना झाला नाही.

प्रवास करून खेळाडू थकले होते. या सामन्यानंतर बांग्लादेश पुन्हा हरारेला आला. २३ जानेवारीला अमेरिकेला पराभूत करत सुपर-६मध्ये प्रवेश केला. सुपर-६चा तो सामना २६ जानेवारीला बुलवायोमध्ये होता. इंग्लड विरुद्धचा तो सामना संघाने गमावला आणि या स्पर्धेतून बाहेर झाले. यावरून बांग्लादेशच्या खेळाडूंचा अतिप्रवास संघाच्या कामगिरीवर झालेला वाईट परिणाम असे कारण सांगत बीसीबीने आयसीसीला धारेवर धरले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---