---Advertisement---

धोनीच्या नेतृत्वाखाली अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या खेळाडूने घेतली निवृत्ती

On: बुधवार, नोव्हेंबर 18, 2020 5:46 PM
---Advertisement---

भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवणारा भारतीय वेगवान गोलंदाज सुदीप त्यागीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला आहे. सुदीप मंगळवारी (17 नोव्हेंबर) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त झाला. 33 वर्षीय गोलंदाज सुदीपने चार एकदिवसीय आणि एक टी -20 सामन्यात टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले. 2009 मध्ये धोनीच्या नेतृत्वात श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने पदार्पण केले होते.

पहिल्या टी -20 सामन्यात त्यागीला कोणतेही यश मिळाले नाही, परंतु एकदिवसीय सामन्यात त्याने श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज कुमार संगकाराला त्याचा पहिला बळी ठरवून धमाका केला होता. 2010 मध्ये त्याने भारतीय संघाकडून अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर त्याला भारतीय संघाकडून संधी मिळाली नाही. आयपीएल 2009 आणि 2010 या दोन हंगामात तो चेन्नई सुपर किंग्सकडून 14 सामने खेळला होता. ज्यात त्याला मात्र 6 गडी बाद करता आले होते.

निवृत्तीची घोषणा करताना त्यागी म्हणाला की, ‘माझ्या स्वप्नाला निरोप देणे, हा आतापर्यंतचा सर्वात अवघड निर्णय आहे.’

त्याने प्रथम श्रेणी सामन्यांत 41 सामने खेळत 109 बळी घेतले आहेत तर 23 अ दर्जाच्या सामन्यांत 31 बळी घेतले आहेत. तो म्हणाला की, ‘आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न आहे. जे मी पूर्ण केले. भारताचा ध्वज असलेली जर्सी अंगावर घालणे, हे एक स्वप्न होते जे मी पूर्ण करू शकलो आहे.’

सुदीप त्यागी म्हणाला की, ‘मला एमएस धोनीचे आभार मानायचे आहेत, ज्याच्या कर्णधारपदी मी माझा पहिला एकदिवसीय सामना खेळला. माझे आदर्श मोहम्मद कैफ, आरपी सिंग आणि सुरेश रैना यांचेही मला आभार मानायचे आहेत.’

महत्त्वाच्या बातम्या –

अरेरे..! कमीतकमी स्वतःच नाव तरी बदल; पाहा का झाला शोएब मलिक सोशल मीडियावर ट्रोल

ही ‘त्रिमूर्ती’ गाजवणार आयपीएल २०२१चा मेगा लिलाव; निवृत्त झालेला खेळाडू होणार मालामाल?

विराट एकटाच दोन खेळाडूंच्या बरोबरीचा! ऑस्ट्रेलियन दिग्गजाची विराटवर स्तुतीसुमने

ट्रेंडिंग लेख –

ही ‘त्रिमूर्ती’ गाजवणार आयपीएल २०२१चा मेगा लिलाव; निवृत्त झालेला खेळाडू होणार मालामाल?

पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी

क्रिकेटमध्ये ख्रिस गेलने १० वर्षांपूर्वी केले होते दुसरे त्रिशतक, पाहा दोनदा त्रिशतक करणारे अन्य तीन खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---