टीम इंडियासाठी आजचा दिवस खूप खास आहे. इतिहासाच्या पानांवर नजर टाकली तर एक सोनेरी आठवण पाहायला मिळेल. म्हणजेच 2007 मध्ये या दिवशी टीम इंडियाने टी20 विश्वचषक जिंकला आणि एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ टी20 क्रिकेटचा पहिला चॅम्पियन बनला. हा प्रसंग सुद्धा खुप खास होता कारण टीम इंडियाने एका रोमांचक अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला होता. शेवटच्या षटकापर्यंत सामना सुरू राहिला आणि श्रीशांतने जोगिंदर शर्माच्या चेंडूवर मिस्बाह-उल-हकचा झेल घेत संघाला विजय मिळवून दिला. यावेळी प्रत्येकाला रवी शास्त्री यांचे आयकॉनिक कॉमेंट्री आठवते. जेव्हा त्यांनी…In the air…Sreesanth takes it. India Win! असं म्हणाले होते.
आज (24 सप्टेंबर) रोजी जोहान्सबर्ग येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 विश्वचषक 2007 चा अंतिम सामना खेळला गेला होता. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमावून 157 धावा केल्या. गौतम गंभीरने 54 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 75 धावा केल्या होत्या. तर रोहित शर्माने 16 चेंडूत 30 धावा केल्या. त्याने 2 चौकार आणि 1 षटकार लगावला. वीरेंद्र सेहवागच्या दुखापतीमुळे सलामीवीर म्हणून खेळणाऱ्या युसूफ पठाणने 8 चेंडूत 15 धावा केल्या. याशिवाय कोणत्याही फलंदाजाचा स्ट्राईक रेट 100 पेक्षा जास्त नव्हता.
तर 158 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 19.3 षटकात 152 धावांत गारद झाला आणि भारताने हा सामना पाच धावांनी जिंकला. इरफान पठाण आणि आरपी सिंगने प्रत्येकी 3, तर जोगिंदर शर्माने 2 बळी घेतले. जोगिंदर शर्मानेच शेवटचे षटक टाकले. ज्यात त्याने मिस्बाह-उल-हकला श्रीशांतकडे झेलबाद केले. श्रीशांतचा हा झेल आयकॉनिक होता आणि त्यावेळी रवी शास्त्री यांनी कॉमेंट्री करताना म्हटलं होतं, ‘In the air…Sreesanth takes it. India Win!, ही ओळ आजही प्रत्येकाच्या मनात ताजी आहे.
INDIA – CHAMPIONS OF ICC T20 WORLD CUP 2007…!!! 🇮🇳
– MS Dhoni and his boys scripted history on this day 17 years ago. 🙇♂️pic.twitter.com/Eh6yzBq98Z
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 24, 2024
हेही वाचा-
एकदिवसीय सामन्यात अंपायरिंग करण्यासाठी पंचांना किती पगार मिळतो?
कानपूर कसोटीतही सर्फराज खानला संधी नाही! मोठे अपडेट समोर
कानपूरची खेळपट्टी फिरकीसाठी लाभदायी; दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची रणनीती काय असू शकते?