सध्या पाकिस्तान आणि इंग्लंड (Pakistan And England) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना मुल्तानच्या मैदानावर रंगला आहे. या सामन्यादरम्यान शान मसूदच्या (Shan Masood) नेतृत्वाखाली पाकिस्तान क्रिकेट संघाने इतिहास रचला आणि मोठा रेकाॅर्ड आपल्या नावावर केला. वास्तविक, या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावात 556 धावा केल्या. यासह पाकिस्तानी संघाने इतिहास रचला.
पाकिस्तानने मुल्तान क्रिकेट स्टेडियमवर 556 धावांची सर्वोच्च धावसंख्या केली. मुल्तानच्या मैदानावर कसोटीतील कोणत्याही डावात पाकिस्तानने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी या मैदानावर पाकिस्तानची सर्वोच्च धावसंख्या 546 धावा होती, जी 2001 मध्ये झाली होती. त्यावेळी संघाचा कर्णधार वकार युनूस होता.
मुल्तान क्रिकेट स्टेडियममध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकाॅर्ड भारताच्या नावावर आहे. 2004 मध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध 675/5 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. या सामन्यात भारताचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) ऐतिहासिक खेळी खेळली. दरम्यान त्याने 309 धावा ठोकल्या होत्या. त्यावेळी महान सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) 194 धावांची नाबाद खेळी केली होती.
मुल्तानमध्ये पाकिस्तानच्या टाॅप-5 सर्वाच्च धावसंख्या
556 धावा- पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (2024)
546/3 धावा- पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश (2001)
461/7 धावा- पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज (2006)
407 धावा- पाकिस्तान विरुद्ध भारत (2004)
357 धावा- पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज (2006)
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-बांगलादेश सामन्यावर पावसाचे सावट? कसे राहणार दिल्लीतील हवामान?
Champion’s Trophy; भारतीय संघ ठरवणार चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलचे ठिकाण?
माजी दिग्गजाचा भारताच्या युवा खेळाडूला सल्ला! म्हणाला, “त्याला ऑस्ट्रेलियाविरूद्ध…”