पुणे। ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित, एमक्युअर फार्मासिटिकल पुरस्कृत व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी चॅम्पियनशीप सिरीज 12 वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात स्मित उंडरे, आर्यन किर्तने यांनी तर, मुलींच्या गटात रित्सा कोंडकर, शिबानी गुप्ते या खेळाडूंनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे.
नटराज टेनिस कोर्ट, कर्वेनगर येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या स्पर्धेत एकेरीत उपांत्य फेरीत बिगरमानांकित आर्यन किर्तने याने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत दुसऱ्या मानांकित वरद उंडरे [2] 4-6, 6-4, 6-2असा तीन सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरी गाठली. अव्वल मानांकित स्मित उंडरेने चौथ्या मानांकित आरव पटेलचा 6-1, 6-1 असा सहज पराभव केला. दुहेरीत उपांत्य फेरीत स्मित उंडरे व वरद उंडरे यांनी पृथ्वीराज दुधाने व अधिराज दुधाने यांचा 6-3, 6-4 असा तर, आर्यन किर्तने व आरव पटेल यांनी सर्वज्ञ सरोदे व अंशुल पुजारी यांचा 6-4, 6-2 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
मुलींच्या गटात उपांत्य फेरीत चौथ्या मानांकित रित्सा कोंडकरनेआठव्या मानांकित गौरी यालेचा 6-2, 6-2 असा पराभव करून आगेकूच केली. शिबानी गुप्तेने हिने श्रावी देवरेचा 2-6, 6-4, 7-5 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुहेरीत रित्सा कोंडकरने काव्या पांडेच्या साथीत सारा फेंगसे व सृष्टी सूर्यवंशी या जोडीचा 6-4, 4-6, 10-2 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
निकाल: उपांत्य फेरी:
मुले:
स्मित उंडरे[1] वि.वि.आरव पटेल[4]6-1, 6-1;
आर्यन किर्तने वि.वि.वरद उंडरे [2] 4-6, 6-4, 6-2;
मुली:
रित्सा कोंडकर [4] वि.वि.गौरी याले[8]6-2, 6-2;
शिबानी गुप्ते वि.वि.श्रावी देवरे 2-6, 6-4, 7-5;
दुहेरी गट: उपांत्य फेरी:
मुले:
स्मित उंडरे/वरद उंडरे[1]वि.वि.पृथ्वीराज दुधाने/अधिराज दुधाने 6-3, 6-4;
आर्यन किर्तने/आरव पटेल[4] वि.वि.सर्वज्ञ सरोदे/अंशुल पुजारी 6-4, 6-2;
मुली:
मायरा टोपणो/शिबानी गुप्ते वि.वि.प्रांजली पांडुरे/तुहिना रॉय 6-2, 6-2;
रित्सा कोंडकर/काव्या पांडे[2] वि.वि.सारा फेंगसे/सृष्टी सूर्यवंशी[3] 6-4, 4-6, 10-2.
महत्त्वाच्या बातम्या –
माही मार रहा है! आयपीएलमध्ये ‘असा’ पराक्रम तीन वेळा करणारा धोनी एकमेवच
याला काय अर्थय! धोनी अन् जडेजाच्या ‘या’ २ चुकांमुळे चेन्नईला करावा लागला विजयासाठी संघर्ष