संपूर्ण क्रिकेटजगतात सध्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल चर्चा सुरु आहे. क्रिकेटचे चाहते अगदी आतुरतेने या अंतिम सामन्याची वाट पाहत आहेत. साउथम्पटन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आजपासून (१८ जून) या ऐतिहासिक सामन्याचा शुभारंभ होणार आहे. दरम्यान, विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला अवघे काही तास शिल्लक असताना साउथम्पटनमधून क्रिकेटप्रेमींसाठी अत्यंत वाईट बातमी पुढे येत आहे.
आज सुरू होणाऱ्या या सामन्यापुर्वी साउथम्पटनमधील वातावरण बिघडले आहे. तिथे काल रात्रभर मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे शुक्रवारी (१८ जून) होणाऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवसाचे पहिले सत्र रद्द करण्यात आले आहे. याबरोबरच नाणेफेकही उशिरा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
इंग्लंडच्या वेळेनुसार हा सामना ठीक १० वाजता चालू होणार होता आणि भारतात बरोबर ३ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. तत्पुर्वी २.३० वाजता नाणेफेक होणार होती.
साउथम्पटनच्या वातावरणाकडे सगळेच क्रिकेटप्रेमी नजर ठेऊन बसले आहेत. परंतु, ‘एक्युवेदर’चा अहवाल निराशा करणारा आहे. त्या अहवालात दाखविले आहे की, १८ जूनपासून ते २२ जूनपर्यंत पावसाची शक्यत्ता दर्शवली गेली आहे. आजही सामन्याच्या कालावधीत मध्ये मध्ये पावसाची संततधार सुरूच राहील. ज्यामुळे पहिल्या दिवसाचे पहिले सत्र पावसामुळे रद्द झाले आहे.
Update from Southampton 🌧️
The toss has been delayed and there will be no play in the opening session. #WTC21 Final | #INDvNZ pic.twitter.com/9IAnIc56jQ
— ICC (@ICC) June 18, 2021
Update: Unfortunately there will be no play in the first session on Day 1 of the ICC World Test Championship final. #WTC21
— BCCI (@BCCI) June 18, 2021
Along with the delay of the coin toss, it has been confirmed that there will be no play before lunch (12:30pm UK / 5:00pm IST) due to the persistent rain and the state of the ground.
FOLLOW LIVE:
👉 https://t.co/upbPQbHWkG 👈#WTC21 | #WTCFinal pic.twitter.com/vRTw7iHSuv— 🏏Flashscore Cricket Commentators (@FlashCric) June 18, 2021
येत्या २४ तासात थांबून थांबून सरी पडण्याची शक्यता
‘एक्युवेदर’च्या अहवालानुसार, साउथम्पटनमध्ये येत्या २४ तासात थांबून थांबून पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज येतो आहे. साउथम्पटनमध्ये उच्चतम तापमान १६ डिग्री असेल आणि कमीतकमी १२ डिग्री असेल. तसेच दिवसभर थंड हवा असण्याची शक्यता आहे. असेच वातावरण पूर्ण ५ दिवस असू शकते. त्यामुळे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पावसाचीच फलंदाजी बघायला मिळणार की काय? यावरून सगळे क्रिकेट चाहते चिंतेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी चॅम्पियनशीपपुर्वी झालेल्या टेस्ट ग्रँड फायनल्सचा ‘असा’ राहिलाय इतिहास, वाचा सविस्तर
लईच भारी! ईशांत शर्मा बनला मयंक अगरवालचा हेयरस्टायलिस्ट, व्हिडिओचा सोशल मीडियावर धुमाकूळ
‘आपापसांत सराव सामने खेळणे निरुपयोगी, कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात न्यूझीलंडचेच पारडे जड’