पुणे, दि. 14 डिसेंबर 2022 – पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी फिल्ट्रम चॅलेंजर करंडक निमंत्रित 25 वर्षाखालील गटाच्या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर युनायटेड स्पोर्ट्स क्लब, क्लब ऑफ महाराष्ट्र, डेक्कन जिमखाना या संघांनी विजय मिळवला.
डिझायर स्पोर्ट्स मैदानावरील सामन्यात आज पहिल्या डावात युनायटेड स्पोर्ट्स क्लबच्या अद्वय शिधये(3-49), आनंद ठेंगे(2-27)यांच्या भेदक गोलंदाजीपुढे पीबीकेजेसीए संघाचा डाव 47.4 षटकात सर्वबाद147धावावर संपुष्टात आला. यात दिग्विजय जाधव 56, ओंकार खाटपे 32, यश खळदकर 27 यांनी धावा केल्या. तत्पूर्वी काल पहिल्या डावात युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाने 88.5 षटकात सर्वबाद 317धावा केल्या व पीबीकेजेसीए संघाला 147 धावांवर रोखून युनायटेड स्पोर्ट्स क्लबने पहिल्या डावात 170 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाने 23.4षटकात 5बाद 130 धावा करून डाव घोषित केला. यात अद्वैय शिधये 42, संदीप शिंदे 37, आदित्य राजहंस 25 यांनी धावा केल्या. सामना अनिर्णित राहिल्यामुळे युनायटेड स्पोर्ट्स क्लब पहिल्या डावाच्या (170 धावांच्या) आघाडीवर विजय मिळवला.
पूना क्लब मैदानावरील लढतीत क्लब ऑफ महाराष्ट्र संघ आज 37 षटकात 8 बाद 126धावापासून खेळ पुढे सुरु झाला. तत्पूर्वी काल पहिल्या डावात पुना क्लब संघ 46.4 षटकात सर्वबाद 129धावावर आटोपला. याच्या उत्तरात क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने 51.5 षटकात सर्वबाद 211धावा करून पहिल्या डावात क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने 82 धावांची आघाडी घेतली. यामध्ये आदिल अन्सारीने संयमपूर्ण खेळी करत 111 चेंडूत 11चौकार,6 षटकारासह 111 धावांची शतकी खेळी केली. त्याला यश क्षीरसागर 39, शुभम मैड 21 यांनी धावा काढून संघाला आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या डावात फिरकीपटू शुभम मैड(6-59) याच्या भेदक गोलंदाजीपुढे पुना क्लब संघाचा डाव 62.1 षटकात सर्वबाद 221 धावावर संपुष्ठात आला. यात सौरभ दोडके 41, अखिलेश गवळे 38, यशवंत काळे 27, देव नवले 24 यांनी धावा केल्या. याच्या उत्तरात क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने दिवसअखेर 9 षटकात 3बाद 75धावा केल्या. सामना अनिर्णित राहिल्यामुळे क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने पहिल्या डावाच्या (82 धावा) आघाडीवर विजय मिळवला.
पीआयओसी मैदानावरील सामन्यात पहिल्या डावात शुभम हरपळे 49, शुभंकर हर्डीकर 34, निशांत नगरकर 25, सोहम लेले 23, तनय संघवी 19 यांनी केलेल्या धावांच्या जोरावर स्टार क्रिकेट अकादमी संघाला 56.2 षटकात सर्वबाद 180धावापर्यंत मजल मारता आली. डेक्कन जिमखाना संघाकडून दीपक डांगी(5-46), आयुष काबरा(2-37) यांनी भेदक गोलंदाजी केली. याच्या उत्तरात डेक्कन जिमखाना संघाने 44.1 षटकात सर्वबाद 248धावा केल्या. यामध्ये धीरज फटांगरे 69, अजय बोरुडे 42, स्वप्नील फुलपगार 35, प्रथमेश पाटील 38 यांनी धावा काढून संघाला पहिल्या डावात 68धावांची आघाडी घेतली. स्टार क्रिकेट अकादमीकडून स्वराज वाबळे(5-82), सरिश देसाई(3-61) यांनी सुरेख गोलंदाजी केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
डिझायर स्पोर्ट्स मैदान: पहिला डाव: युनायटेड स्पोर्ट्स क्लब: 88.5 षटकात सर्वबाद 317धावा वि.पीबीकेजेसीए: 47.4 षटकात सर्वबाद147धावा(दिग्विजय जाधव 56(120,8×4), ओंकार खाटपे 32(40,3×4,1×6), यश खळदकर 27, अद्वय शिधये 3-49, आनंद ठेंगे 2-27); युनायटेड स्पोर्ट्स क्लबने पहिल्या डावात 170 धावांची आघाडी घेतली;
दुसरा डाव: युनायटेड स्पोर्ट्स क्लब: 23.4षटकात 5बाद 130धावा(डावघोषित)(अद्वैय शिधये 42 (39,4×4,2×6), संदीप शिंदे 37 (34,4×4,2×6), आदित्य राजहंस 25, गणेश मते 2-8, यश खळदकर 2-57) वि.पीबीकेजेसीए: सामना अनिर्णित; युनायटेड स्पोर्ट्स क्लब पहिल्या डावात (170 धावांच्या) आघाडीवर विजयी
पूना क्लब मैदान: पहिला डाव: पुना क्लब: 46.4 षटकात सर्वबाद 129धावा वि. क्लब ऑफ महाराष्ट्र : 51.5 षटकात सर्वबाद 211धावा(आदिल अन्सारी 111(111,11×4,6×6), यश क्षीरसागर 39(66,7×4), शुभम मैड 21, अखिलेश गवळे 3-63, राजकमल सिंग चौहान 2-47, हर्ष ओस्वाल 2-45);क्लब ऑफ महाराष्ट्र संघाकडे पहिल्या डावात 82 धावांची आघाडी;
दुसरा डाव: पुना क्लब : 62.1 षटकात सर्वबाद 221 धावा(सौरभ दोडके 41(53,5×4,2×6), अखिलेश गवळे 38, यशवंत काळे 27, देव नवले 24, शुभम मैड 6-59,अनुश भोसले 2-1) वि. क्लब ऑफ महाराष्ट्र: 9 षटकात 3बाद 75धावा(ओंकार येवले 35, अखिलेश गवळे 2-43); सामना अनिर्णित; क्लब ऑफ महाराष्ट्र पहिल्या डावाच्या (82 धावा) आघाडीवर विजयी;
पीआयओसी मैदान: पहिला डाव: स्टार क्रिकेट अकादमी: 56.2 षटकात सर्वबाद 180धावा(शुभम हरपळे 49(72,6×4,2×6), शुभंकर हर्डीकर 34, निशांत नगरकर 25, सोहम लेले 23, तनय संघवी 19, दीपक डांगी 5-46, आयुष काबरा 2-37) वि. डेक्कन जिमखाना : 44.1 षटकात सर्वबाद 248धावा(धीरज फटांगरे 69(48,10×4,4×6), अजय बोरुडे 42(34,3×4,4×6), स्वप्नील फुलपगार 35, प्रथमेश पाटील 38, स्वराज वाबळे 5-82, सरिश देसाई 3-61); सामना अनिर्णित; डेक्कन जिमखाना पहिल्या डावाच्या (68धावांच्या) आघाडीवर विजयी; (United Sports Club, Deccan Gymkhana, Club of Maharashtra win the under-25 two-day cricket tournament on the strength of the first innings lead)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आतापासूनच सचिनची बरोबरी करू लागला अर्जुन! रणजी पदार्पणाच्या सामन्यात गोव्यासाठी शतकीय खेळी
शाहिद आफ्रिदीचा पाकिस्तान संघाला घरचा आहेर, ‘या’ दिग्गज खेळाडूला बाहेर काढण्याची मागणी