रविवारचा दिवस संपूर्ण जगासाठी खूपच खास होता. कारण, या दिवशी म्हणजेच 18 जून रोजी जगभरात ‘फादर्स डे’ साजरा करण्यात आला. अनेक खेळाडूंनी आपापल्या वडिलांसोबतचे फोटो शेअर करत ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा दिल्या. अनेक खेळाडूंनी वेगवेगळ्या प्रकारे आपल्या वडिलांसोबत हा दिवस साजरा केला. मात्र, युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल याचे वडिलांसोबतचे सेलिब्रेशन सर्वात लक्षवेधी ठरले. चला तर, पठ्ठ्याने नेमकं काय केलंय, हे पाहूयात…
ख्रिस गेल (Chris Gayle) हा जगातील सर्वात विस्फोटक फलंदाजांमध्ये गणला जातो. त्याच्यापुढे भल्याभल्या गोलंदाजांची लेंथ आणि लाईन बिघडली आहे. त्याने अनेक विक्रमांचे मनोरेही रचले आहेत. याव्यतिरिक्त तो सोशल मीडियावर भरपूर सक्रियदेखील असतो. विशेष म्हणजे, त्याला क्लब पार्टी करण्याचीही आवड आहे. तो नेहमी क्लबविषयी चर्चेत असतो. आता त्याने ‘फादर्स डे’ (Fathers Day) या खास निमित्ताने त्याने वडील डूडले गेल (Dudley Gayle) यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. मात्र, या सर्वांमध्ये गेल काही वेगळ्या अंदाजात सेलिब्रेशन करताना दिसला.
चक्क ख्रिस गेल वडिलांना नाईट क्लबमध्ये घेऊन गेला. त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर आपल्या वडिलांसोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत गेल त्याच्या वडिलांसोबत ठुमके लावताना दिसत आहे. गेलची ही अनोखी भेट त्याच्या वडिलांसोबतच चाहत्यांच्याही पसंतीस पडत आहे.
https://www.instagram.com/reel/CtngwqfAWxR/?utm_source=ig_embed&ig_rid=1a18e16f-cfa7-4191-a260-cc567ecbad61
ख्रिस गेल कधी घेणार निवृत्ती?
ख्रिस गेल याने वेस्ट इंडिज संघासाठी अखेरचा सामना 2021 विश्वचषकात खेळला होता. मात्र, अद्याप त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे. युनिव्हर्स बॉस (Universe Boss) याला जेव्हा निवृत्तीविषयी प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने म्हटले की, तो त्याचा अखेरचा सामना जमैका या घरच्या मैदानावर खेळू इच्छितो. तोपर्यंत तो निवृत्ती घेणार नाहीये. गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून ते लीग सामन्यांपर्यंत आपला डंका वाजवला आहे. टी20 विश्वचषकातील पहिल्या शतकाचा विक्रमही गेलच्या नावावर आहे. (universe boss chris gayle made his father enter night club and dance with him see video)
महत्वाच्या बातम्या-
शेवटी चहलच्या वेदना समोर आल्याच; म्हणाला, ‘माझी फक्त एवढीच इच्छा…’
श्रीमंत हार्दिक! वहिनीने बूट चोरीसाठी मागितली मोठी रक्कम, पठ्ठ्याने झटक्यात ट्रान्सफर केली पाच पट रक्कम