आज जगभरात आपल्या देशाचे नाव उंचावणारे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा मंगळवारी (दि. 29 ऑगस्ट) जन्मदिवस आहे. त्यांनी आपल्या करिश्माई हॉकी खेळाने सर्वांना वेड लावले होते. आजही लोक त्यांना आणि त्यांच्या जादूई खेळास विसरलेले नाहीत. मेजर ध्यानचंद सर्वांसाठी आदर्श होते. आजही लोक त्यांच्या महान कर्तृत्वासमोर आदराने नतमस्तक होतात. आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्याविषयी काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊया.
– मेजर ध्यानचंद यांना ‘हॉकीचे जादूगर’ म्हटले जाते.
– मेजर ध्यानचंद यांना हॉकीत वेगवान गोल करण्यासाठी देखील ओळखले जात असे.
– मेजर ध्यानचंद यांची जयंती 29 ऑगस्टला असते त्यामुळे देशभर हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.
– मेजर ध्यानचंद यांचे खरे नाव ध्यानसिंग असे होते.
– मेजर ध्यानचंद रात्री चंद्राच्या प्रकाशात हॉकीचा सराव करायचे. म्हणून त्यांच्या मित्रांनी त्यांचे नाव चंद्र असे ठेवले होते. तेव्हापासून ते ध्यानचंद या नावाने ओळखले जाऊ लागले.
– ध्यानचंद यांनी देशाला सलग तीन ऑलम्पिक पदके मिळवून दिली होती.
– वर्ष 1928, 1932, 1936 या तिन्ही ऑलम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
– भारत सरकारने त्यांना 1956 साली पद्मभूषण पुरस्काराने गौरवले होते.
– मेजर ध्यानचंद यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 400 च्या वर गोल केले होते.
– जेव्हा मेजर ध्यानचंद यांना हिटलरने दिली होती ऑफर- जेव्हा एखादी गोष्ट देशाच्या अभिमान आणि अब्रूवर येते. तेव्हा कोणताही व्यक्ती वा खेळाडू स्वाभिमान विकत नाही. भलेही त्यास प्राणास मुकावे लागले तरी चालेल. असाच एक किस्सा जर्मनी ऑलम्पिक दरम्यान घडला होता.
दिनांक 14 ऑगस्ट 1936 रोजी जर्मनी विरुद्ध भारत हा सामना होणार होता. पावसामुळे हा सामना रद्द होऊन दुसऱ्या दिवशी 15 ऑगस्ट 1936 रोजी खेळवण्यात आला होता. या सामन्यात मेजर ध्यानचंद यांनी अनवाणी पायांनी खेळत भारताला सामना जिंकवून दिला होता. सामना पाहण्यासाठी स्वतः हिटलर उपस्थित होता. तो सामना पाहून तो खूप प्रभावित झाला. त्याने ध्यानचंद यांना जर्मनीकडून खेळण्यासाठी प्रस्ताव दिला. याशिवाय सैन्यात मोठा हुद्दा देण्याबाबतही सांगितले. किंतु ध्यानचंद यांनी त्यास प्रस्तावास नम्रपणे नकार दिला आणि म्हणाले, “भारत हा माझा देश आहे आणि मी माझ्या देशावर खूप प्रेम करतो.”
हेही वाचलंच पाहिजे-
‘पाकिस्तानचा संघ भारतापेक्षा खूपच भारी, रोहित-विराटची तर…’, पाकिस्तानी क्रिकेटरचे बडेबोल
केएल राहुलबद्दल धक्कादायक ब्रेकिंग! कोच द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, ‘Asia Cup 2023मधील…’