भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा रविवारी (दि. 30 एप्रिल) त्याचा 36वा वाढदिवस साजरा करत आहे. 2007 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील फलंदाज म्हणून पदार्पण केलेल्या रोहित शर्माने मागील काही वर्षात सलामीवीर म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्याने आत्तापर्यंत अनेक विक्रम केले.
रोहितने आत्तापर्यंत 49 कसोटी सामने खेळले असून 45.66च्या सरासरीने 3379 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 243 वनडे सामन्यात 48.63च्या सरासरीने 9825 धावा केल्या आहेत. रोहित हा भारताकडून सर्वाधिक टी20 सामने खेळणारा खेळाडू आहे. त्याने 148 टी20 सामने खेळले असून 31.32च्या सरासरीने 3853 धावा केल्या आहेत.
आज वाढदिवस असणाऱ्या रोहितबदद्ल या काही खास गोष्टी-
-नागपूरला 30 एप्रिल, 1987 रोजी जन्मलेला रोहित शर्मा मराठी, हिंदी, इंग्रजी व तेलुगू भाषा अतिशय उत्तम बोलतो.
-रोहितचे कोच दिनेश लाड आहेत. त्यांनीच रोहितला फलंदाज केले. दिनेश लाड यांचा मुलगा सिद्धेश मुंबईकडून रणजी सामने खेळतो. तसेच सिद्धेश मुंबई इंडियन्सकडून रोहितच्या नेतृत्वाखाली 2019ला 1 सामना खेळला होता.
👊🏻🔥 Setting the stage on fire whenever and wherever he walks in – the name is Ro-HIT Sharma 😎
Happy Birthday, Captain 💙#OneFamily #MumbaiIndians #HappyBirthdayRohit #HitmanDay @ImRo45 pic.twitter.com/ALOmyZ6NnE
— Mumbai Indians (@mipaltan) April 29, 2021
-एकेवेळी रोहितला शाळेत फी भरायलाही पैसे नव्हते. परंतु त्याची क्रिकेटमधील क्षमता पाहुन त्याला शाळेनेच स्काॅलरशीप दिली होती.
– रोहितने त्याचा आवडता फलंदाज विरेंद्र सेहवागला भेटायला शाळेला दांडी मारली होती. पुढे त्याच सेहवागबरोबर रोहित तो 52 सामने खेळला व त्याच्याच जागी पुढे भारतीय संघात जागा पक्की केली.
-भारतीय संघातील सर्वात झोपाळू आणि विसराळू क्रिकेटपटू म्हणून रोहितकडे संघसहकारी पाहतात.
– रोहितने 13 डिसेंबर 2015 रोजी रितीका सजदेहबरोबर विवाह केला. रितीका युवराज सिंगची मानलेली बहीण आहे तर रोहितची स्पोर्ट्स मॅनेजरही आहे.
5 yrs down….lifetime to go @ritssajdeh 😍 pic.twitter.com/PoYknOjLN5
— Rohit Sharma (@ImRo45) December 13, 2020
-सन 2015मध्ये प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्काराने रोहित शर्माला सन्मानित करण्यात आले होते.
-रोहित शर्माने वनडेमध्ये 3 द्विशतके केली आहेत. असा पराक्रम करणारा तो पहिला आणि सध्यातरी एकमेव क्रिकेटपटू आहे. रोहितने 2013ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदा 209 धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याने 2014 ला श्रीलंकाविरुद्ध 173 चेंडूत 264 धावांची वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च धावांची खेळी केली. तर त्याने 2017 ला श्रीलंकेविरुद्धच नाबाद 208 धावांची खेळी करत तिसरे द्विशतक केले.
– रोहित वनडे क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावांची खेळी करणारा क्रिकेटपटू आहे. त्याने हा विश्वविक्रम त्याचे वनडेतील दुसरे द्विशतक करताना केला. त्याने 13 नोव्हेंबर 2014 ला श्रीलंकाविरुद्ध 173 चेंडूत 264 धावांची वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च धावांची खेळी केली.
#OnThisDay in 2014, a @ImRo45 record 💥💥
12……1…….11…41.1.4.1..11.1.41..4141…211…1.1……1111111.11114121..414..2114114.644.1114111.64.141.144.64.1111141.11161.1.21..61144414114441466.4.1414464161141☝️ pic.twitter.com/khn9525MjB
— ICC (@ICC) November 13, 2020
-आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्ये रोहित दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आयपीएलमधून 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
-रोहित आयपीएलमध्ये 6 पैकी 6 अंतिम सामने खेळाडू म्हणून जिंकणारा एकमेव खेळाडू आहे. तो 2009 मध्ये आयपीएल विजेत्या डेक्कन चार्जर्स संघाचा भाग होता तर 2013, 2015, 2017, 2019 व 2020ला त्याने मुंबई इंडियन्सकडून कर्णधार म्हणून आयपीएलचे विजेतेपद मिळवले.
– रोहित हा आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून 5 विजेतीपदे मिळवणारा पहिला खेळाडू आहे. त्याने 2013, 2015, 2017, 2019 व 2020 ला त्याने मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळताना आयपीएलचे विजेतेपद मिळवले.
-कसोटी, वनडे व टी20 प्रकारात शतक करणारा रोहित सुरेश रैनानंतरचा दुसरा भारतीय ठरला होता.
-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीनही प्रकारात 3 किंवा त्यापेक्षा अधिक शतके करणारा रोहित एकमेव खेळाडू आहे.
-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 किंवा अधिक षटकार मारणारा रोहित शाहिद आफ्रिदी (535) आणि ख्रिस गेल (476) नंतरचा केवळ तिसरा खेळाडू. रोहितने 526 षटकार मारले आहेत.
-आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 4 शतके करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. त्याने 2015 ला टी20 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदा शतक केले. त्यावेळी त्याने 106 धावा केल्या होत्या. त्यानंतर रोहितने 2017 ला श्रीलंकेविरुद्ध 118 धावांची शतकी खेळी केली होती. यानंतर त्याने 2018 ला वेस्ट इंडिज आणि इंग्लंड संघाविरुद्ध अनुक्रमे 111 आणि नाबाद 100 धावांची शतके केली.