Breaking ! घोषणा झाली… टी20 वर्ल्डकपसाठी न्यूझीलंड संघ जाहीर, केन विलियम्सनकडे नेतृत्वाची धूरा, पाहा संपूर्ण संघ

येत्या जून महिन्यात (2024) होणाऱ्या टी20 क्रिकेटच्या (T20WC) महासंग्रामासाठी अर्थात टी20 क्रिकेट वर्ल्डकपसाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून अंतिम संघाची घोषणा करण्यात आली आहे. पुन्हा एकदा केन विलियम्सन (Kane Williamson) याच्या हाती नेतृत्वाची धुरा देण्यात आली असून टी20 वर्ल्डकपसाठी ब्लॅक कॅप्स तयार असल्याचे सांगण्यात आले आहे. यासह वर्ल्डकपसाठी संघ जाहीर करणारा न्यूझीलंड हा पहिला देश आणि संघ ठरला आहे.
आज (दि. 29 एप्रिल) एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने न्यूझीलंड टीमची घोषणा करण्यात आली. दोन चिमुकल्यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये येत न्यूझीलंड टीमची घोषणा केली. यंदा वेस्ट इंडिज आणि यु.एस.ए. येथे टी20 वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. वेस्ट इंडिज आणि यु.एस.ए. येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी न्यूझीलंडकडून खास नव्या जर्सीचे देखील अनावरण करण्यात आले आहे. ( New Zealand name T20 World Cup 2024 squad Kane Williamson to captain )
2024 टी20 वर्ल्डकपसाठी न्यूझीलंड संघ –
केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, ट्रेंट बोल्ट, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर , ईश सोधी , टिम साउथी
New Zealand’s T20 World Cup squad:
Williamson (C), Allen, Boult, Bracewell, Chapman, Conway, Ferguson, Henry, Mitchell, Neesham, Phillips, Rachin, Santner, Sodhi and Southee. pic.twitter.com/AvMgaErO1p
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 29, 2024
टी20 विश्वचषक स्पर्धेत, 2016 साली संघाला सेमीफायनल, 2021 साली फायनल आणि 2022 साली सेमीफायनलमध्ये घेऊन जाणाऱ्या केन विलियम्सनवर चौथ्यांदा टी20 विश्वचषक स्पर्धेत संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. केन विलियम्सन सोबत ट्रेंट बोल्ट, जिमी नीशन, लॉकी फर्ग्युसन, ग्लेन फिलिप्स आदी अनुभवी खेळाडूंची साथही असणार आहे.
Join special guests Matilda and Angus at the squad announcement for the upcoming @t20worldcup in the West Indies and USA. #T20WorldCup pic.twitter.com/6lZbAsFlD5
— BLACKCAPS (@BLACKCAPS) April 29, 2024