भारताला १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकवून देणारा कर्णधार उन्मुक्त चंद याने बीग बॅश लीगमध्ये (बीबीएल) पदार्पण केले आहे. तो या लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू देखील आहे. त्याला मेलबर्न रेनेगेड्स संघाने होबार्ट हरिकेन्सविरुद्धच्या सामन्यात बीबीएलमध्ये पदार्पणाची संधी दिली. मात्र, चंदला पदार्पणाल प्रभाव पाडण्यात अपयश आले आहे.
बीबीएल २०२१-२२ च्या ५४ व्या सामन्यात होबार्ट हरिकेन्स संघाकडून खेळणाऱ्या नेपाळी फिरकी गोलंदाज संदीप लामिछाने चंदला मोठा फटका खेळण्यास मोहात पाडले आणि मिड-विकेट सीमारेषेवर त्याचा झेल घेतला. मॅचदरम्यान चंद १५व्या षटकामध्ये फलंदाजीसाठी तो आला होता.
चंदने आपल्या डावात ८ चेंडूंचा सामना केला. १८ व्या षटकादरम्यान चंदला संदीपने त्याच्या फिरकी चेंडूवर शॉट मारण्याची संधी दिली. चंदने चेंडू लगावला आणि कालेब ज्वेलने सोपा झेल घेत चंदला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सहज आऊट झाल्यामुळे चंद खूप निराश दिसत होता.
Not Unmukt's night tonight… Sandy gets his man! #BBL11 pic.twitter.com/W3XM0yuVaa
— KFC Big Bash League (@BBL) January 18, 2022
१९ वर्षांखालील विश्वचषक विजेता माजी कर्णधार उन्मुक्त चंद मंगळवारी ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश टी२० लिगमध्ये मेलबर्न रेनेगेड्ससाठी पदार्पण करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला. २८ वर्षीय उजव्या हाताच्या फलंदाजाने होबार्ट हरिकेन्सविरुद्ध बीबीएलमध्ये पदार्पण केले. रेनेगेड्सने टीमने जर्सीमधिल त्याच्या छायाचित्रासह ट्विट केले होते की, “नवीन रंग शोभातोय उन्मुक्त चंदला.”
मेलबर्नने चंदला संघात ठेवले होते. परंतु, मागील १२ सामन्यांपासून चंदला खेळण्याची संधी देण्यात आली नव्हती. बीबीएलमध्ये पदार्पण करण्यासाठी चंदला काही काळ प्रतीक्षा करावी लागली.
चंदच्या नेतृत्वाखाली भारताने २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियात आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये चंदने भारतीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली, ज्यामुळे तो परदेशात लीग खेळण्यास पात्र ठरला. १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेतील यशानंतर त्याने भारत अ संघाचे नेतृत्वही केले आहे. पण तो कधीही वरिष्ठ संघाचा भाग होऊ शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीच्या कलेक्शनमध्ये आणखी एका नव्या कारची भर! लिलावात खरेदी केली ‘ही’ क्लासिक गाडी
व्हिडिओ पाहा – २०११ विश्वचषक भारताचे हिरो, ज्यांचे योगदान आज कोणाला आठवत नाही