---Advertisement---

उन्मुक्त चढला बोहल्यावर! ‘ही’ प्रसिद्ध उद्योजिका बनली त्याची नववधू

On: रविवार, नोव्हेंबर 21, 2021 11:23 PM
---Advertisement---

भारताच्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट संघाचा माजी विश्‍वविजेता कर्णधार उन्मुक्त चंद हा नुकताच बोहल्यावर चढला. प्रसिद्ध फिटनेस कोच सिमरन खोसला हिच्यासोबत त्याने लग्नगाठ बांधली. सिमरन आणि उन्मुक्त यांनी आपआपल्या सोशल मीडिया हँडलवरून याबाबतची माहिती दिली. मोजके मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

घरगुती वातावरणात पार पडला लग्नसोहळा
सन २०१२ मध्ये भारतीय संघाला एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार असलेल्या उन्मुक्त याने दिल्ली येथे लग्नगाठ बांधली. त्याने लग्नामध्ये गुलाबी शेरवानी तर सिमरन हीने पारंपरिक कुमाऊनी पिचोरा परिधान केला होता. भरदार दागिन्याऐवजी तिने केवळ मेकअप आणि सिंदूर लावला होता.

कोण आहेस सिमरन
सिमरन खोसला ही प्रसिद्ध न्यूट्रिशननिस्ट व फिटनेस कोच आहे. न्यूट्रिशनसंबंधित बटलीकीनोप्रिकॉट या ब्रँडची मालकीण आणि संस्थापिका आहे. तिला या क्षेत्रामध्ये तिच्या फिटनेससाठी ओळखले जाते. ती तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून सातत्याने फिटनेस संबंधी व्हिडिओ शेअर करत असते.

नुकताच निवृत्त झाला उन्मुक्त
उन्मुक्त चंद यांनी काही महिन्यांपूर्वी भारतीय क्रिकेटशी संबंध तोडत निवृत्तीची घोषणा केली होती. भारतीय संघात संधी मिळत नसल्याने त्याने अमेरिकेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तो सध्या अमेरिकेत वास्तव्य करत असून, तेथेच स्थानिक स्पर्धा खेळत असतो. त्याने भारताच्या १९ वर्षाखालील संघाचे तसेच भारत अ संघाचे नेतृत्व केले आहे. नुकतेच त्याला बिग बॅश या ऑस्ट्रेलियातील टी२० लीगमधील मेलबर्न रेनेगेड्स संघाने करारबद्ध केले असून, या स्पर्धेत खेळणारा तो पहिला भारतीय ठरेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---