भारताने २०१२ साली १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. ज्यात उन्मुक्त चंदने कर्णधारपद भूषविले होते. चंदने शुक्रवारी (१३ऑगस्ट) भारतातील सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. यानंतर चंदने अमेरिकेतील ‘मायनर क्रिकेट लीग’ स्पर्धा खेळण्यासाठी करार देखील केला होता.
मात्र, या स्पर्धेतील सिलिकॉन व्हॅली स्ट्राइकर्स संघाकडून पदार्पण करणाऱ्या चंदची सुरुवात खराब राहिली. चंद आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच शून्यावर बाद झाला. चंद एका आत येणाऱ्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. याबाबतचा व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यावर्षीच्या विजय हजारे आणि सय्यद मुस्ताक अली सारख्या मर्यादित षटकांच्या स्पर्धेत देखील चंदला दिल्लीच्या संघाकडून खेळायला संधी मिळाली नव्हती. त्यामुळे भारतातील सर्व क्रिकेट प्रकारातून निवृत्ती घेऊन अमेरिकेतील मायनर क्रिकेट लीग खेळण्याचा निर्णय त्याने घेतल्याचे समजते.
I don't think Unmukt Chand will be sharing this on his Instagram Stories anytime soon. Third-ball duck on @MiLCricket debut for the ex-India 2012 U19 World Cup winning captain. He was opening the batting for Silicon Valley Strikers in Morgan Hill, California today. pic.twitter.com/El0G1fLmP1
— Peter Della Penna (@PeterDellaPenna) August 15, 2021
चंदला देशांतर्गत स्पर्धांमध्ये देखील जास्त संधी मिळाली नाही. २०१९-२० मध्ये त्याला उत्तराखंड संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. परंतु, तिथे त्याला खास प्रदर्शन करता आले नाही. या संघासोबत त्याने शेवटच्या ६ सामन्यांमध्ये केवळ १४४ धावा केल्या होत्या.
यानंतर त्याने २०२०-२१ पुन्हा दिल्लीकडून खेळण्याचे ठरवले. तिथेही त्याला सय्यद मुस्ताक अली स्पर्धेत दिल्ली संघाच्या निवडकर्त्यांनी संधी दिली नाही. नंतर त्याला विजय हजारे स्पर्धेसाठी संघात स्थान दिले होते. परंतु, एकाही सामन्यात त्याला खेळायची संधी मिळाली नाही.
चंदने वयाच्या १८ व्या वर्षीच इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) पदार्पण केले होते. यानंतर उन्मुक्त चंदची तुलना विराट कोहलीशी करण्यात येऊ लागली होती. चंदच्या निवृत्तीनंतर ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’ सोबत बोलताना तो म्हणाला, “आयपीएलमध्ये खेळणे माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता. परंतु, मी या बाबतीत भाग्यवान नव्हतो.”
मुंबई इंडियन्सकडून खेळताना २०१५ साली त्याने पहिल्यांदा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध आयपीएलचे अर्धशतक लावले होते. यानंतर त्याला जास्त संधी मिळाली नाही आणि हळूहळू तो आयपीएल मधूनही दूर होत गेला.
महत्वाच्या बातम्या –
–खास वेलकम! क्रिकेटच्या भाषेत पायलटने केले मुंबई इंडियन्सचे शानदार स्वागत, व्हिडिओ जिंकेल तुमचेही मन
–…म्हणून भारताविरुद्ध रूटच्या बॅटमधून होतेय धावांची वर्षा, इंग्लंडच्या माजी कर्णधाराने सांगितले रहस्य
–वाढदिवस विशेष- कसोटी क्रिकेट गाजवलेल्या चंद्रपाॅलबद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी