---Advertisement---

उन्मुक्त चंदने गाजवली अमेरिका! १० षटकार आणि ३० चौकारांच्या मदतीने ठोकल्या ३०४ धावा

On: गुरूवार, सप्टेंबर 9, 2021 12:20 AM
unmukt-Chand
---Advertisement---

भारतामध्ये क्रिकेटला संधी नसल्यामुळे अनेक भारतीय खेळाडूंनी अल्पवयातच भारताच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन अमेरिकेतील मायनर क्रिकेट लीग खेळण्याचा निर्णय घेतला. अमेरिकाने तिथल्या क्रिकेटला चालना मिळण्यासाठी एका स्पर्धेचे आयोजन केले होते. ज्यामध्ये त्यांनी जगातील तमाम क्रिकेटपटूंना ही स्पर्धा खेळण्यासाठी आमंत्रित केले होते. ज्यानंतर भारतातल्या अनेक खेळाडूंनी अमेरिकेची वाट पकडली होती, त्यातीलच एक म्हणजे उन्मुक्त चंद. त्याच चंदने एका सामन्यादरम्यान ताबडतोब फलंदाजी करत ६३ चेंडूत ९० धावा केल्या.

भारतातून क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतल्यानंतर चंद अमेरिकेतील मायनर क्रिकेट लीगमधील सिलिकॉन व्हॅली स्ट्रायकर्स संघासोबत करार देखील केला होता. चंदने या मालिकेत आता पर्यंत उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. नुकतेच त्याने त्याच्या संघाला एक शानदार विजय देखील मिळवून दिला आहे.

चंदने शिकागो ब्लास्टर्स विरुद्ध १४२ च्या स्ट्राइक रेटने ६३ चेंडूमध्ये दमदार ९० धावांची खेळी केली. ज्यामध्ये त्याने १० चौकार आणि ३ षटकार देखील लगावले होते. यासह चंदच्या संघाने हा सामना ९ विकेट्सने आपल्या नावे केला.

तसेच चंदसोबत वेस्टइंडीजचा फलंदाज नरसिंह देवनारायणने देखील उत्कृष्ट प्रदर्शन केले. देवनारायणने ३० चेंडूमध्ये नाबाद ५१ धावा केल्या. तर श्रीलंकेचा शेहान जयसूर्याने २० धावांची खेळी केली.

चंदने आतापर्यंत या स्पर्धेत ८ सामन्यात ६०.८० च्या सरासरीने ३०४ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये चंदने एकूण १० षटकार आणि ३० चौकार देखील लावले आहेत. यात चंदचा स्ट्राईक रेट देखील ११३ पेक्षा जास्त होता. चंदने आतापर्यंत एकूण ३ अर्धशतक देखील लगावले आहेत. ज्यामध्ये त्याची सर्वोच्च खेळी ९० धावांची राहिली आहे.

भारताच्या या खेळाडूने भारतात क्रिकेटला संधी नसल्यामुळे वयाच्या २८ व्या वर्षीच भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. विशेष म्हणजे चंदने त्याच्या नेतृत्वात २०१२ साली १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारताला जेतेपद मिळवून दिले होते. तसेच आयपीएलमध्ये चंद दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि मुंबई इंडियन्स संघांकडून देखील खेळला आहे.

तसेच तो प्रथम श्रेणीत दिल्लीच्या संघाकडून देखील खेळत होता. मात्र, चंदला भारतात आपल्या कौशल्याची छाप पाडता आली नाही. परिणामस्वरूप त्याला भारतीय क्रिकेटमध्ये कमी संधी मिळू लागले. यालाच लक्षात घेता चंदने अमेरिकेतील मायनर लीग खेळण्यासाठी भारतातून निवृत्ती घेण्याचे ठरवले होते.

महत्वाच्या बातम्या –
सुरेश रैनाने धोनीच्या मैदानातील आवडत्या डायलॉग विषयी केला खुलासा, म्हणाला…
हिटमॅनचा कहर! सलग ७ व्यांदा रोहित शर्मा टी२० विश्वचषकात खेळणार, पाहा आजपर्यंतचे सर्व भारतीय संघ
बिग ब्रेकिंग! टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, अश्विनचे ४ वर्षांनी पुनरागमन, तर शिखरला वगळले

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---