आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आणखी एक वर्षाचा अवधी बाकी आहे. मात्र जगभरातील क्रिकेट रसिकांना मात्र या विश्वचषकाचे वेध आत्तापासूनच लागले आहे.
पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होत असलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यांच्या तिकिटांसाठी जगभरातील क्रिकेट रसिकांडून प्रचंड मागणी होत असल्याचे आयसीसीने प्रसिद्धी पत्रकातून जाहिर केले.
या टिकिटांची मागणी फक्त इंग्लंड आणि वेल्समधूनच नव्हे तर संपूर्ण जगभरातून होत असल्याची माहिती आयसीसीने दिली.
या विश्वचषकातील 48 पैकी 42 सामन्यांच्यी तिकिटांसाठी जगभरातून एक मिलियनपेक्षा जास्त अर्ज आले आहेत.
यामधील सर्वात जास्त तिकिट मागणी 14 जुलै 2019 ला लॉर्ड्स मैदानावर होणाऱ्या अंतिम सामन्याठी आहे.
अपेक्षेप्रमाणे ओल्ड ट्रॅफोडच्या वेंबली स्टेडिअमवर होणाऱ्या भारत-पाकिस्तान या हाय व्होल्टेज सामन्यासाठी स्टेडियमच्या क्षमतेपेक्षा दुप्पट तिकिटांची मागणी आली आहे.
पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे दोन्ही देशांचे किक्रेट चाहते मोठ्या अपेक्षेणे पहात आहेत.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 19 जून 2019 ला ओल्ड ट्रॅफोडच्या वेबंली स्टेडियमवर होणार आहे.
2019 चा आयसीसी एकदिवसीय विश्वचषक इंग्लंडमध्ये 30 मे पासून सुरू होत आहे.
30 मे 2019 ला पहिला सामना यजमान इंग्लंड विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:






