---Advertisement---

WPL: यूपीचा दिल्लीवर 33 धावांनी शानदार विजय! जुना बदला केला पूर्ण

On: शनिवार, फेब्रुवारी 22, 2025 11:33 PM
---Advertisement---

महिला प्रीमियर लीगमध्ये (Women Premier League 2025) यूपी वॉरियर्सने दिल्ली कॅपिटल्सचा 33 धावांनी धुव्वा उडवला. या स्पर्धेत त्यांचा हा पहिलाच विजय आहे आणि गेल्या सामन्यात दिल्लीविरुद्ध झालेल्या पराभवाचा बदलाही त्यांनी घेतला आहे. यूपीच्या विजयात सर्वात मोठे योगदान चिनेल हेन्रीने दिले. तिने 62 धावांची आक्रमक खेळी केली आणि संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

यूपीकडून गोलंदाजीत क्रांती गौर आणि ग्रेस हॅरिस यांनी धारदार गोलंदाजी करत प्रत्येकी 4-4 विकेट्स आपल्या नावावर केल्या.

या सामन्यात, यूपी वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करताना धावफलकावर 177 धावा जोडल्या. एकेकाळी, यूपीची अवस्था खूपच वाईट झाली होती, कारण संघाने 89 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या. पण येथूनच वेस्ट इंडिजची आक्रमक फलंदाज चिनेल हेन्रीने 18 चेंडूत तुफानी अर्धशतक झळकावले.

चिनेल हेन्रीने महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात सर्वात जलद अर्धशतक करणारी खेळाडू बनली आहे. हेन्रीने 23 चेंडूत 62 धावांची तुफानी खेळी केली आणि यूपीला 177 धावांपर्यंत पोहोचवण्यास मोलाची मदत केली.

178 धावांचे लक्ष्य ठेवून मैदानात उतरलेल्या दिल्लीसाठी कर्णधार मेग लॅनिंग फक्त 5 धावा करून तंबूत परतली. शफाली वर्माची (Shafali Verma) 30 चेंडूत 24 धावांची संथ खेळी दिल्ली संघासाठी खूप महागडी ठरली. जेमिमा रॉड्रिग्जने 35 चेंडूत 8 चौकार आणि एका षटकारासह 56 धावांची खेळी करत दिल्लीच्या आशा जिवंत ठेवल्या.

पण त्यानंतर संपूर्ण दिल्ली संघ कोसळला. एकेकाळी दिल्लीचा धावसंख्या 5 बाद 111 धावा होती, पण संघाचे पुढील 5 विकेट्स 33 धावांच्या आतच पडले. अशाप्रकारे संपूर्ण दिल्ली संघ 144 धावांवर सर्वबाद झाला आणि या स्पर्धेत यूपी वाॅरियर्सने 33 धावांनी शानदार विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs PAK: दुबईतील खेळपट्टी गोलंदाजांना साथ देणार की फलंदाजांना? सामन्यापूर्वी गिलने स्पष्टच सांगितले
“स्वार्थ सोड बाबर!” – भारताशी लढतीच्या आधी माजी खेळाडूंची तुफान टीका
2 मोठे बदल करून मैदानात उतरू शकतो भारतीय संघ, भारत-पाक सामन्यापूर्वी संघ घेऊ शकतो मोठे निर्णय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---