---Advertisement---

“स्वार्थ सोड बाबर!” – भारताशी लढतीच्या आधी माजी खेळाडूंची तुफान टीका

On: शनिवार, फेब्रुवारी 22, 2025 9:56 PM
---Advertisement---

बाबर आजम बऱ्याच काळापासून पाकिस्तान संघाचा मुख्य फलंदाजांपैकी एक आहे. पण मागच्या काही काळापासून त्याची बॅट शांत आहे. आता त्याच्यावर जास्त दबाव आला असेल कारण, 23 फेब्रुवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफी मधील पाकिस्तान विरुद्ध भारत सामना होणार आहे. या महासामन्याआधी पाकिस्तानचे माजी क्रिकेटर दानिश कनेरीया यांनी बाबर आझमला स्वार्थी म्हणून नवीन वादाला आमंत्रण दिले आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाला 321 धावांचं लक्ष पार करायचं होतं. मोठ टार्गेट असून सुद्धा बाबर आझमने 90 चेंडूत 64 धावांची हळूहळू पारी खेळली. त्यामुळे बाबर आझमवर खूप टीका होत आहेत.

न्यूज एजन्सी पीटीआय नुसार दानिश कनेरीया म्हणाले, जर बाबर आझम बद्दल बोलायचे झाले तर, तो स्वतःसाठी खेळतो आणि जेव्हा तो दबावामध्ये असतो तेव्हा जास्त धावा करण्याऐवजी आयसीसी रँकिंग मध्ये टॉप स्थानी राहण्याचा प्रयत्न करतो, मी 50 धावा केल्या, मी हे करून दाखवलं पण त्यामध्ये संघ जिंकण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले दिसून येत नाहीत.

दानिश कनेरीया यांनी खुशदिल शाह आणि सलमान आगा यांचे कौतुक केले. न्यूझीलंडच्या विरुद्ध सामन्यात सलमान आगा ने 42 धावांची वेगाने पारी खेळली. तसेच खुशदिल शाहने 69 धावांची चांगली पारी खेळून पाकिस्तानला खूप मोठ्या संख्येच्या अंतराने हरण्यापासून वाचवले होते .

23 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्या विषयी दानिश कनेरिया यांचं म्हणणं आहे की, भारतीय संघ खूप मजबूत स्थितीमध्ये आहे. आणि भारतीय संघ सलग चार सामने जिंकून आला आहे. तसेच पाकिस्तान संघ सोबतच दोन सामने पराभूत झाला आहे. कनेरीया म्हणाले भारतीय संघ या वेळी खूप शानदार क्रिकेट खेळत आहे.

हेही वाचा

2 मोठे बदल करून मैदानात उतरू शकतो भारतीय संघ, भारत-पाक सामन्यापूर्वी संघ घेऊ शकतो मोठे निर्णय

IND vs PAK: “मला वाटतं की पाकिस्तान जिंकावा” माजी भारतीय क्रिकेटपटूच्या वक्तव्यानं उडाली खळबळ!

भारतीय संघाची चिंता वाढली! यष्टीरक्षकाला ताप, काय म्हणाला शुबमन गिल.??

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---