नुकतीच आयसीसीने ताजी महिला एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. भारतीय महिला संघाची अनुभवी फलंदाज आणि कर्णधार मिताली राज आयसीसी महिला एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजांमध्ये ७ व्या क्रमांकावर कायम आहे. तर स्मृती मंधाना ९ व्या क्रमांकावर कायम आहे. ऑस्ट्रेलियासाठी एलिसा हिली ताज्या जाहीर झालेल्या क्रमावारीनुसार फलंदाजांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर इंग्लंडची नताली स्किवेर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोघींनी न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषकात उत्कृष्ट प्रदर्शन केले होते.
भारताची ३९ वर्षीय अनुभवी फलंदाज मिताली राज (Mitali Raj) यावर्षी खेळल्या गेलेल्या महिला विश्वचषकात भारताचे नेतृत्व करत होती. भारतीय संघासाठी विश्वचषक काही खास गेला नाही. संघ उपांत्य सामन्यापर्यंत देखील पोहोचला नाही. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला गेला होता आणि ऑस्ट्रेलियाने यामध्ये विजय मिळवला होता.
नुकतीच पाकिस्तान आणि श्रीलंका महिला संघांत एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळली गेली. या दोन्ही मालिका पाकिस्तानने जिंकल्या. पाकिस्तान संघाची सलामीवीर फलंदाज सिदरा अमीनने या मालिकेतील प्रदर्शानंतर थेट १९ स्थानांची उडी घेत ३५ वा क्रमांक गाठला आहे. तिने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत २१८ धावा केल्या आहेत. श्रीलंकन संघाची कर्णधार चामरी अटापट्टूनेही या मालिकेत चांगले प्रदर्शन केले. तिने मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शतक ठोकले होते आणि याचा फायदा तिच्या क्रमवारीवर झाला आहे. चामरी अटापट्टूने ६ स्थानांची झेप घेत २३ वा क्रमांक गाठला आहे.
गोलंदाजांच्या यादीत इंग्लंडची दिग्गज सोफी एक्लेस्टोन पहिल्या क्रमांकावर, तर दक्षिण आफ्रिका संघाची शबनम इस्माईल दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाची जेस जॉनसेन तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वानी गोलंदाजांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर कायम आहे. अष्टपैलूच्या यादीत इंग्लंडची नताली स्किवेर पहिल्या क्रमांकावर कायम आहे. या यादीत दुसरा क्रमांक आहे ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरीचा, तर तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकाची मारियान कॅप कायम आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अश्विनला पछाडत चहल बनणार टी२० क्रिकेटचा किंग! नंबर १ बनण्यापासून फक्त इतक्या विकेट्सने दूर
अरेरे! आझमच्या पाकिस्तान संघावर ओढावू शकते वनडे विश्वचषक न खेळताच बाहेर होण्याची नामुष्की