मागील काही दिवसांपासून आपण सुरू केलेल्या वर्ल्डकप काउंटडाऊन या मालिकेतील आता अखेरच्या दिवसाची वेळ आलेली आहे. विश्वचषक इतिहासात नंबर वन असणाऱ्या भागीदारीला काउंटडाऊनमध्ये प्रथम क्रमांकाचा मान मिळाला. विश्वचषक इतिहासातील ही सर्वोत्तम भागीदारी केली होती श्रीलंकेचे तिलकरत्ने दिलशान व उपुल थरंगा यांनी.
भारतीय उपखंडात खेळल्या गेलेल्या 2011 झिम्बाब्वेविरुद्ध त्यांनी हा कारनामा केला होता. पलेकल्ले येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात श्रीलंकेला प्रथम फलंदाजीची संधी मिळालेली. त्या संपूर्ण विश्वचषकात शानदार फॉर्ममध्ये असलेल्या दिलशान व थरंगा जोडीने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांवर अक्षरशा वर्चस्व गाजवले. 44.4 षटकात या दोघांनी 282 धावांची विश्वविक्रमी भागीदारी रचली. वन डे विश्वचषक इतिहासातील ही सलामीसाठीची सर्वोत्तम भागीदारी आहे.
या सामन्यात दिलशान याने 131 चेंडूंचा सामना करताना 144 धावा केल्या होत्या. यामध्ये 16 चौकार व एका षटकाराचा समावेश होता. तर, दुसऱ्या बाजूने थरंगा यांनी 133 धावांची शानदार खेळी केलेली. या दोघांच्या खेळीमुळे श्रीलंकेने 327 धावांचा डोंगर उभा केला. याच सामन्यात दिलशान याने गोलंदाजीतही आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती. त्याने तीन षटकात केवळ चार धावा देऊन चार जणांना तंबूचा रस्ता दाखवलेला. श्रीलंकेने या विश्वचषकात अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र, अंतिम फेरीत भारतीय संघाने त्यांचा पराभव केला.
(Upul Tharanga and Tillakaratne Dilshan registered the highest first wicket World Cup partnership in 2011, scoring 282 runs)
हेही वाचा-
जयस्वाल की जय! एशियन गेम्समध्ये ठोकले वादळी शतक, रिंकूचाही जलवा
सराव सामन्यात इंग्लंड पुढे बांगलादेश पस्त! टोप्ली-मोईनने गाजवली गुवाहाटी