---Advertisement---

रिषभ पंतबाबत प्रश्न विचारताच भडकली उर्वशी! पत्रकारालाच म्हणाली, “तुला काय पाहिजे?”

On: शनिवार, मार्च 25, 2023 10:51 PM
rishabh pant Urvashi Rautela
---Advertisement---

बॉलिवुड अभिनेत्री उर्वशी रौतेला (urvashi Rautela) आणि भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) यांच्या चर्चा मागच्या काही महिन्यांपासून माध्यमांमध्ये होत होती. उर्वशीने अनेकदा पंतचे नाव न घेता त्याच्यावर निशाणा देखील साधल्याचे आपल्याला पाहायला मिळालेले. सध्या रिषभ अपघातानंतर उपचार घेत असताना देखील, आता याच संबंधित चर्चा नव्याने सुरू झाली आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मागील वर्षाच्या अखेरीस रिषभचा एक गंभीर अपघात झाला होता. तेव्हापासून रिषभ अद्याप उपचार घेत आहे. रिषभ व उर्वशी यांचे पूर्वी प्रेमसंबंध होते अशी चर्चा होती. मात्र, त्यानंतर दोघांच्या नात्यात कटूता निर्माण झाली. मागील वर्षी ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान दोघांमध्ये चांगलेच सोशल मीडिया वॉर रंगलेले सर्वांनी पाहिले. त्यानंतर दोघांनी या वादावर पडदा टाकलेला.

https://www.instagram.com/reel/CqMlSj8P8rs/?igshid=YmMyMTA2M2Y=

 

रिषभच्या अपघातानंतर उर्वशीने एक सोशल मीडिया पोस्ट करत त्याच्या बरे होण्यासाठी प्रार्थना केली होती. यासंबंधीचा एक प्रश्न नुकताच एका मुलाखतीत उर्वशीला विचारला गेला. तू रिषभशी पुन्हा काही बोलली आहे का? असे विचारल्यानंतर तिने शांतपणे प्रश्न ऐकून घेतला. त्यावर संपूर्ण वेळ घेत उत्तर देताना म्हटले,

“तुम्हाला नक्की काय हवं आहे हे मला माहित आहे. तुम्हाला केवळ टीआरपी टीआरपी आणि टीआरपी हवा असतो.” असे उत्तर देत ती तेथून निघून गेली.‌

रिषभचा 31 डिसेंबर रोजी पहाटे उत्तराखंड येथील रूडकी येथे अपघात झाला होता. यामध्ये त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. आगामी वनडे विश्वचषकापर्यंत तो पुनरागमन करू शकतो.

(Urvashi Rautela Getting Angry On Question About Rishabh Pant)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---