आशिया चषकातील 2022 मधील बहुचर्चित असा भारत-पाकिस्तान सामना रविवारी(28 ऑगस्ट)ला पार पडला. ही कट्टर प्रतिद्वंध्वींची लढत पाहण्यासाठी सिनेसृष्टीतील अनेक सिताऱ्यांनी उपस्थिती लावलेली होती. यात गेल्या काही दिवसांपासून रिषभ पंतसह सोशल मीडियावर ट्रेंडला असणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला ही सुद्धा सामना पाहण्यासाठी थेट मैदानात उपस्थित होती. यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा उर्वशी रौतेलावर ट्रोलरने निशाणा साधला.
https://twitter.com/shyguysharad/status/1563951457073631234
विशेष म्हणजे उर्वशी सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित राहिली. मात्र, या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत प्लेइंग11 मधून बाहेर होता. त्याच्या जागी दिनेश कार्तिकला संघात स्थान देण्यात आले. त्यामुळे युझर्सनी या दोन्ही गोष्टींचा मेळ घालत सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव सुरू केला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
दमदार प्रदर्शन करूनही भुवनेश्वर ऐवजी हार्दिकला का मिळाला सामनावीर पुरस्कार? जाणून घ्या
देशप्रेमापोटी मेजर ध्यानचंद यांनी नाकारली होती चक्क हिटलरची ऑफर; वाचा त्यांच्याबद्दलच्या रोमांचक गोष्टी
बदला पूर्ण! हार्दिक-जड्डूच्या तडाख्यात पाकिस्तान उडाली; आशिया कपमध्ये टीम इंडियाचा विजयी श्रीगणेशा






