भारतीय संघाचा युवा फलंदाज रिंकू सिंग आयपीएल 2023 स्पर्धेतील सामन्यात एका षटकात 5 षटकार मारून एका रात्रीत स्टार बनला होता. आता रिंकूसारखीच कामगिरी यूएस मास्टर्स टी10 लीग 2023 स्पर्धेतही पाहायला मिळाली आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिंकूच्या अंदाजात 5 षटकार मारताना दिसत आहे. त्याचा यादरम्यानचा व्हिडिओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ऍरॉन फिंचने भिरकावले 5 षटकार
यूएस मास्टर्स टी10 लीग 2023 (US Masters T10 League 2023) स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ऍरॉन फिंच कॅलिफोर्निया नाईट्स संघाकडून खेळतो. त्याने सोमवारी (दि. 21 ऑगस्ट) न्यूजर्सी लिजेंड्सविरुद्ध खेळताना शानदार फलंदाजी केली. त्याने एकाच षटकात 5 षटकार मारले. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांना रिंकू सिंग (Rinku Singh) याची आठवण झाली. फिंचची फटकेबाजी पाहून प्रेक्षकांचेही चांगलेच मनोरंजन झाले.
खरं तर, फिंचने वेगवेगळ्या अंदाजात हे पाच षटकार मारले. लिया प्लंकेट टाकत असलेल्या सातव्या षटकातील चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर दोन खणखणीत षटकार मारले होते. त्यानंतर ख्रिस बार्नवेल नववे षटक टाकण्यासाठी आला. त्याच्या पहिल्या पाच चेंडूवर फिंचने वेगवेगळ्या दिशेला 5 षटकार मारले.
Why we call him the Aaronator 👊
Take a bow @AaronFinch5 6️⃣6️⃣6️⃣6️⃣6️⃣#USMastersT10 #NJTvCK #SunshineStarsSixes#CricketsFastestFormat #T10League pic.twitter.com/NUdccQxuKq
— US Masters T10 (@USMastersT10) August 21, 2023
अवघ्या 31 चेंडूत 75 धावांची खेळी
ऍरॉन फिंच याने सामन्यात 31 चेंडूत 75 धावांची खेळी साकारली. त्याच्या या खेळीत 3 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. मात्र, त्याच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. फिंचच्या खेळीच्या जोरावर कॅलिफोर्निया संघाने 10 षटकात 3 विकेट्स गमावत 116 धावा केल्या होत्या. मात्र, आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूजर्सी संघाने 2 चेंडू शिल्लक ठेवत आव्हान पार केले. न्यूजर्सीकडून भारताचे माजी फलंदाज नमन ओझा आणि युसूफ पठाण यांनी शानदार खेळी साकारली होती. (us masters t10 league cricketer aaron finch hit five consecutive sixes in five balls like rinku singh see video)
हेही वाचा-
US Master T10 League: गंभीर अन् रैना सुपरफ्लॉप, हरभजन सिंगच्या संघाचा दणदणीत विजय
The Hundred लीगमध्ये घोंगावलं हॅरी ब्रूक नावाचं वादळ, ठोकलं स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक