वर्षातील अखेरची ग्रँड स्लॅम यूएस ओपन 2023 स्पर्धेतील महिला चॅम्पियनशिपचा अंतिम सामना शनिवारी (दि. 09 सप्टेंबर) खेळला गेला. या सामन्यात अमेरिकेची 19 वर्षीय टेनिस खेळाडू कोको गॉफ हिने बाजी मारत विजेतेपद पटकावले. तिने अंतिम सामन्यात बेलारूसच्या जागतिक द्वितीय मानांकित आर्यना सबालेंका हिला 2-6, 6-4, 6-2 अशा सेटमध्ये पराभूत केले. हा सामना 2 तास 6 मिनिटे चालला. कोको फ्लशिंग मीडोज येथे 1999मध्ये सेरेना विलियम्स हिच्यानंतर सर्वात तरुण विजेती बनली. यूएस ओपनमधील कोकोचे हे पहिले मोठे विजेतेपद होते. ओपन एरानंतर (1968) फ्लशिंग मीडोज येथे कोको 28वी महिला एकेरी चॅम्पियन बनली.
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर यूएस ओपन 2023 (US Open 2023) महिला चॅम्पियनशिपमध्ये कोको गॉफ (Coco Gauff) हिने पहिल्या सेटमध्ये पराभूत झाल्यानंतर पुढील दोन्ही सेटमध्ये दमदार पुनरागमन केले. तसेच, आर्यना सबालेंका (Aryna Sabalenka) हिला अंतिम सामन्यात पराभवाचा धक्का दिला. पहिल्या सेटमध्ये सबालेंकाने कोकोला 6-2ने पराभूत करत आघाडी घेतली होती. मात्र, कोकोने दमदार पुनरागमन करत दुसऱ्या सेटमध्ये 6-3ने विजय मिळवला. तसेच सामना बरोबरीत आणला. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये कोकोने पुन्हा 6-2ने विजय मिळवला.
Coco Gauff won the US Open in epic fashion.
Match point 👇 pic.twitter.com/QMAwRod7B7
— US Open Tennis (@usopen) September 9, 2023
विजयानंतर कोको गॉफवर पैशांचा पाऊस
महिला एकेरी किताब जिंकल्यानंतर कोको गॉफ हिच्यावर पैशांचा पाऊस पडला. माध्यमांतील वृत्तांनुसार, कोको गॉफ हिला 3 मिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये जवळपास 24 कोटी 90 लाख आणि 12 हजार रुपये मिळाले. ही बक्षीस रक्कम मागील वर्षीच्या तुलनेत 15 टक्के जास्त आहे. 2022मध्ये विजय मिळवणाऱ्या इगा स्वियाटेक हिला 2.6 मिलियन डॉलर्स (जवळपास 21,58,10,400 भारतीय रुपये) मिळाले होते. तसेच, उपविजेती ठरलेल्या आर्यना सबालेंका हिला 15,00,000 डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये जवळपास 12 कोटी 45 लाख आणि 06 हजार रुपये मिळाले.
Concrete jungle where dreams are made of…… @usopen pic.twitter.com/Zgx3mRAFkc
— Coco Gauff (@CocoGauff) September 10, 2023
यापूर्वी 2022मध्ये झालेल्या यूएस ओपनमध्ये पोलंडच्या इगा स्वियाटेक हिने बाजी मारली होती. तिने अंतिम सामन्यात ट्यूनिशियाच्या ओन्स जेब्यूरला पराभूत करत अंतिम सामना आपल्या नावावर केला होता. ओपन एरानंतर (1968) सर्वाधिक एकेरी किताब जिंकण्याचा विक्रम अमेरिकेच्या ख्रिस एव्हर्ट आणि सेरेना विलियम्स यांच्या नावावर आहे. दोघांनीही प्रत्येकी 6 वेळा हा किताब जिंकला आहे. यानंतर दुसऱ्या स्थानी स्टेफी ग्राफ असून तिने 5 वेळा यूएस ओपन (US Open) स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. (us open 2023 women champion america s coco gauff become champion in single know prize money here)
हेही वाचाच-
रोहन बोपन्नाचे स्वप्न भंगले! यूएस ओपन फायनलमध्ये झाला पराभव
पुन्हा दिसले धोनीचे टेनिसप्रेम! यूएस ओपनमधील व्हिडिओ व्हायरल, कार्लोस अल्कारेजच्या जवळ बसलाय भारतीय दिग्गज