---Advertisement---

यूएस ओपन विजेत्यांसाठी अशी असेल बक्षिसाची रक्कम

On: शुक्रवार, जुलै 20, 2018 4:02 PM
---Advertisement---

वर्षातील शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा आसलेली यूएस ओपनची मुख्य स्पर्धा 27 आॅगस्टपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत विजेत्या ठरणाऱ्या खेळांडूना मिळणाऱ्या बक्षिसांची रक्कम जाहिर झाली आहे.

यूएस ओपनच्या एकेरीतील महिला आणि पुरुष विजेत्यांना प्रत्येकी 3.8 मिलियन डॉलर्स इतकी बक्षीसाची रक्कम मिळणार आहे. या ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या एकूण पारितोषिकात 53 मिलियन डॉलर्स एवढी वाढ झाली आहे.

मंगळवारी, यूएस टेनिस असोसिएशनने सांगितले की अन्य पारितोषिकांमध्ये दुहेरी गटातील महिला आणि पुरुष संघाला प्रत्येकी 7,00,000 डॉलर्स आणि पात्र ठरण्यासाठी एकूण 3 मिलियन डॉलर्स इतकी बक्षीसाची रक्कम मिळणार आहे.

मागील वर्षी एकेरीतील विजेत्यांना 3.7 मिलियन डॉलर्स इतके पारितोषिक मिळाले होते. तर संपूर्ण स्पर्धेत 50.4 मिलियन डॉलर्सची पारितोषिके देण्यात आली होती.

2013 पासून यूएस ओपन स्पर्धेच्या बक्षीस रकमेत 57टक्के वाढ करण्यात आली आहे.

यावर्षीच्या यूएस ओपन स्पर्धेत नुकताच विंबल्डन विजेता झालेला नोव्हाक जोकोविच, अव्वल स्थानी असलेला राफेल नदाल, रॉजर फेडरर, अँडी मरे, मारिन चिलिच आणि जुआन मार्टीन डेल पेट्रो हे पुरुष एकेरीत सहभागी होणार आहेत.

तर महिला एकेरीत 6 वेळची यूएस ओपन विजेती सेरेना विल्यम्स, व्हिनस विल्यम्स, सोलेन स्टिफन, मारिया शारापोव्हा आणि सामांथा स्तोसुर या सहभागी होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

म्हणून जोकोविचच्या मुलाला पाहाता आली नाही विंबल्डनची फायनल!

कुलदीप यादव अंतिम 11मध्ये हवाच, इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूचे मत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment