---Advertisement---

न्यूयॉर्कपासून बांग्लादेशपर्यंत! पाकिस्तानच्या पराभवाचा आनंद जगभरात साजरा; VIDEO व्हायरल

On: शुक्रवार, जून 7, 2024 11:33 AM
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2024 मध्ये पाकिस्तानला अमेरिकेविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पराभव झाला. या पराभवानंतर पाकिस्तानचे चाहते फारच निराश दिसत होते, तर अमेरिकेच्या चाहत्यांनी जल्लोष साजरा केला. पाकिस्तानचा पराभव होताच अमेरिकेच्या चाहत्यांनी आनंदानं उड्या मारल्या. पाकिस्तानच्या पराभवाचा बांग्लादेशमध्येही आनंद साजरा करण्यात आला, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या सामन्यापूर्वी पाकिस्तानला विजयाचा प्रबळ दावेदार मानलं जात होतं. परंतु अमेरिकेच्या संघानं बाबर आझमच्या संघाला एकही संधी दिली नाही आणि शेवटपर्यंत जबरदस्त झुंज देत सुपर ओव्हरमध्ये रोमहर्षक विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं 20 षटकांत 7 बाद केवळ 159 धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकनं शानदार फलंदाजी केली. एका क्षणी ते सामना सहज जिंकण्याच्या मार्गावर होते. मात्र, अखेरच्या षटकांमध्ये पाकिस्ताननं पुनरागमन केलं, तरीही सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला. सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेनं प्रथम फलंदाजी करत 18 धावा केल्या. प्रत्युत्तरात, पाकिस्तानचा संघ केवळ 13 धावाच करू शकला.

अमेरिकेनं सुपर ओव्हर जिंकताच न्यूयॉर्कमधील चाहत्यांनी आनंदानं उड्या मारल्या, ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे. चाहत्यांनी यूएसए-यूएसए अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्याचवेळी बांग्लादेशचे चाहतेही पाकिस्तानच्या पराभवानं खूश दिसत होते. त्यांच्या सेलिब्रेशनचाही व्हिडिओ समोर आला आहे. तुम्ही हे व्हिडिओ येथे पाहू शकता.

 

 

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यानं अमेरिकेविरुद्धच्या पराभवानंतर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. या पराभवाचं प्रमुख कारण त्यानं पहिल्या 6 षटकातील खराब फलंदाजी असल्याचं सांगितलं. याशिवाय बाबर आझम म्हणाला की, संघाचे फिरकीपटू मधल्या षटकांमध्ये विकेट घेऊ शकले नाहीत. यामुळे या सामन्यात पाकिस्तानला पराभवाला सामोरं जावं लागलं.

महत्त्वाच्या बातम्या – 

पाकिस्ताननं अमेरिकेला हलक्यात घेतलं का? बाबर आझमनं सांगितलं धक्कादायक पराभवामागचं कारण
“ही इतिहासाची पुनरावृत्ती…”, अमेरिकेविरुद्ध पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर शोएब अख्तर भडकला!
पाकिस्तानची नाचक्की! सुपर ओव्हरमध्ये महाराष्ट्राच्या पोराकडून चारीमुंड्या चीत, इतिहासातील सर्वात वाईट पराभव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---