---Advertisement---

टी20 विश्वचषकात पाकिस्तानला हरवणारा यूएसए संघ होऊ शकतो बॅन! आयसीसीच्या निर्णयानंतर टांगती तलवार

On: सोमवार, जुलै 22, 2024 10:22 PM
---Advertisement---

नुकत्याच संपलेल्या टी20 विश्वचषक स्पर्धेत सह-यजमान असलेल्या युएसए संघाने आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली होती. प्रथमच विश्वचषक खेळत असलेल्या यूएसए संघाने सर्वांना चकित करत थेट सुपर 8 पर्यंत मजल मारलेली. यानंतर संघाचे सर्वत्र कौतुक झाले. मात्र, यात संघावर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद बंदी आणण्याची शक्यता आहे.

टी20 विश्वचषक स्पर्धेत सहयजमान असताना यूएसएने आपले विश्वचषक पदार्पण केले. साखळी फेरीत कॅनडा संघाला हरवून त्यांनी चांगली सुरुवात केली. त्यानंतर मात्र त्यांनी थेट मागील विश्वचषकातील उपविजेत्या पाकिस्तानला पराभूत करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. भारतीय संघाविरुद्ध देखील त्यांनी चांगली लढत दिली. यानंतर आयर्लंडविरूद्ध सामन्यात एक गुण मिळवून त्यांनी सुपर 8 फेरी गाठली. संघाच्या या कामगिरीचे कौतुक होत असताना आता यूएसए क्रिकेट संघटनेवर बंदी घातली जाऊ शकते.

नुकतीच कोलंबो येथे आयसीसीची वार्षिक बैठक पार पडली. यामध्ये युएसए क्रिकेट व चिली क्रिकेट संघांना आयसीसीकडून नोटीस देण्यात आली आहे. या दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांना आपल्या संघटनेत असलेल्या कमतरता दूर कराव्या लागतील. युएसए क्रिकेट बोर्डाला अद्यापही पूर्ण वेळ मुख्य कार्यकारी अधिकारी नाही. तसेच त्यांनी अद्याप युएसए ऑलिंपिक व पॅरालिंपिक असोसिएशनकडून मान्यता घेतलेली नाही. पुढील 12 महिन्यांत या दोन्ही देशांना या त्रुटी दूर कराव्या लागतील. ते असे करण्यात अपयशी ठरल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होईल.

युएसए क्रिकेट बोर्डाने या त्रुटी दूर न केल्यास त्याचे त्यांना मोठे परिणाम भोगावे लागू शकतात. कारण, संघाने 2026 टी20 विश्वचषकासाठी पात्रता मिळवलेले आहे. ते या त्रुटी दूर न करू शकल्यास त्यांना विश्वचषकात सहभागी होता येणार नाही. हा विश्वचषक भारत व श्रीलंका येथे आयोजित केला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

करोडोंची संपत्ती, एकापेक्षा एक महागड्या गाड्या, ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा जगतोय असे आलिशान आयुष्य
महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत खेळणार 16 संघ, आयसीसीनं दिली मंजुरी
आयसीसी बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आलेले 4 मोठे निर्णय, टी20 विश्वचषकादरम्यान झालं होतं मोठं नुकसान!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---