---Advertisement---

टी20 विश्वचषकातून बाद होताच सौरभ नेत्रावळकरनं उडवली पाकिस्तानची खिल्ली, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

---Advertisement---

बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ 2024 टी20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. शुक्रवारी (14 जून) अमेरिका आणि आयर्लंड यांच्यात सामना होणार होता. मात्र पावसामुळे हा सामना रद्द झाला. यानंतर पाकिस्तान सुपर 8 च्या शर्यतीतून मधून बाहेर पडला.

पाकिस्तान बाद होताच अमेरिकेचा खेळाडू सौरभ नेत्रावळकर यानं त्यांची खिल्ली उडवली आहे. सौरभनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक पोस्ट शेअर केली. पाकिस्तानची खिल्ली उडवत सौरभनं लिहिले की, “बाय बाय पाकिस्तान”. सौरभच्या या पोस्टला हजारो चाहत्यांनी लाईक केलं आहे. याशिवाय अनेक सोशल मीडिया युजर्सनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

या टी20 विश्वचषकात पाकिस्तानची कामगिरी फारच निराशाजनक झाली. पहिल्या सामन्यात त्यांना अमेरिकेनं पराभूत केलं होतं. अमेरिकेचा संघ सुपर ओव्हरमध्ये जिंकला होता. यानंतर भारताविरुद्ध त्यांचा 6 धावांनी पराभव झाला. सलग दोन पराभवानंतर त्यांनी कमबॅक करत कॅनडाविरुद्ध विजय नोंदवला होता.

टीम अमेरिकेबद्दल बोलायचं झालं तर, आपल्या पहिल्याच विश्वचषकात संघानं उत्कृष्ट कामगिरी केली. कॅनडाविरुद्धचा पहिला सामना अमेरिकेनं 7 गडी राखून जिंकला. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानविरुद्ध धक्कादायक विजय मिळवला. मात्र, भारताविरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आयर्लंडविरुद्धचा सामना रद्द झाल्यानंतर ते सुपर 8 साठी पात्र ठरले.

सुपर 8 मध्ये अमेरिकेचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. हा सामना 19 जून रोजी होईल. यानंतर 22 जूनला त्यांची लढत वेस्ट इंडिज विरुद्ध होणार आहे. भारत आणि अमेरिका टी20 विश्वचषक 2024 च्या ‘अ’ गटात आहेत. या गटातून भारत सर्वप्रथम सुपर 8 साठी पात्र ठरला होता. यानंतर अमेरिकेनं तिकिट मिळवलं. तर पाकिस्तान, कॅनडा आणि आयर्लंड बाहेर पडले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

अमेरिका विरुद्ध आयर्लंड सामना पावसामुळे रद्द, सुपर 8 साठी अमेरिका क्वालिफाय
अफगाणिस्तानसह ‘हे’ संघ सुपर-8 साठी पात्र, न्यूझीलंड-श्रीलंका विश्वचषकातून आउट!
कॅनडाविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे सरावसत्र रद्द! जाणून घ्या कारण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---