टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 सामन्यात रोव्हमन पॉवेलच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिजनं अमेरिकेचा 9 गडी राखून पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेनं 19.5 षटकांत सर्वबाद 128 धावा केल्या. प्रत्युत्तरात, कॅरेबियन संघानं 129 धावांचं लक्ष्य अवघ्या 10.5 षटकांत 1 गडी गमावून गाठलं.
या सामन्यात अमेरिकेचा कर्णधार ॲरॉन जोन्स यानं मारलेला एक षटकार चांगलाच व्हायरल होत आहे. जोन्सनं वेस्ट इंडिजकडून आठवं षटक टाकण्यासाठी आलेल्या अल्झारी जोसेफला तब्बल 101 मीटर लंबा षटकार लगावला! ॲरॉन जोन्सचा हा फटका पाहून वेस्ट इंडिजचे खेळाडू चक्रावून गेले होते. जोन्सच्या या षटकाराचा व्हिडिओ आयसीसीनं आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.
सोशल मीडियावर ॲरॉन जोन्सच्या षटकाराचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. युजर्स यावर सातत्यानं कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओला अवघ्या काही तासांत एका लाखाहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
View this post on Instagram
असं असलं तरी ॲरॉन जोन्स या सामन्यात मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. तो 11 चेंडूत 11 धावा करून बाद झाला. त्याला रोस्टन चेसनं बोल्ड केलं. सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेचा संघ 19.5 षटकांत 128 धावा करून ऑलआऊट झाला होता. प्रत्युत्तरात, वेस्ट इंडिजनं 129 धावांचं लक्ष्य अवघ्या 10.5 षटकांत 1 गडी गमावून गाठलं. या विजयासह वेस्ट इंडिजनं सुपर 8 च्या ग्रुप 2 मध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. संघानं दोन सामन्यांपैकी एका सामन्यात विजय मिळवला असून, एका सामन्यात पराभव पत्कारलाय.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत-बांगलादेश सामन्यावर पावसाचं सावट? आजच्या सामन्यात हवामानाची स्थिती कशी असेल?
वेस्ट इंडिजचा कमबॅक! अमेरिकेला धूळ चारत बदललं सेमीफायनलचं समीकरण
दक्षिण आफ्रिकेचं सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं! इंग्लंडवर बाहेर पडण्याचा धोका