---Advertisement---

“ही इतिहासाची पुनरावृत्ती…”, अमेरिकेविरुद्ध पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर शोएब अख्तर भडकला!

Shoib Akhtar
---Advertisement---

बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानसाठी 2024 टी20 विश्वचषकाची सुरुवात खूपच निराशाजनक राहिली. त्यांना पहिल्याच सामन्यात अमेरिकेविरुद्ध लाजिरवाणा पराभव पत्कारावा लागला. पाकिस्तानच्या या पराभवामुळे निराश झालेल्या माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं आपलं दुःख व्यक्त केलं आहे. अख्तर म्हणाला की, पाकिस्तानचा संघ हा सामना जिंकण्याच्या लायकीचा नव्हता.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं फलकावर 159 धावा लावल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना अमेरिकेनंही 159 धावा केल्या. त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेनं पाकिस्तानसमोर 19 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं, ज्याच्या प्रत्युत्तरात बाबर आझमचा संघ केवळ 13 धावाच करू शकला.

सामना संपल्यानंतर शोएब अख्तरनं लगेचच त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून आपलं दुःख व्यक्त केलं. व्हिडिओमध्ये तो म्हणतोय, “पाकिस्तानचा हा निराशाजनक पराभव आहे. अमेरिकेकडून हरून आम्ही चांगली सुरुवात केली नाही. आम्ही इतिहासाची पुनरावृत्ती केली, जसं आम्ही 1999 च्या विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध हरलो होतो. दुर्दैवानं, पाकिस्तान कधीच विजयाचा हक्कदार नव्हता. अमेरिका खूप चांगली खेळली.” शोएब अख्तर पुढे म्हणाला की, “आमिरनं सामना वाचवला. त्यानं आणि शाहीननं प्रयत्न केले. एकूण चित्र पाहिल्यास, अमेरिकेनं सामन्यातील 37 षटके जिंकली. दुर्दैवानं, आम्ही ते करू शकलो नाही.”

 

सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, नाणेफेक हारल्यानंतर पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजीला आला. संघानं बाबर आझमच्या 44 धावा आणि शादाब खानच्या 40 धावांच्या जोरावर 20 षटकात 159 धावा केल्या. अमेरिकेकडून नॉस्तुश केन्झिगेनं सर्वाधिक 3 बळी घेतले, तर सौरभ नेत्रावळकरनं 2 बळी घेतले.

या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या अमेरिकेसाठी कर्णधार मोनांक पटेलनं अर्धशतक झळकावलं. त्यानं इतर फलंदाजांसह मिळून छोट्या भागीदारीही केल्या, परंतु तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. यजमान संघाला 20 षटकांत 3 गडी गमावून 159 धावा करता आल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

साहेबांच्या खेळात भारतीयांची मक्तेदारी! टी20 विश्वचषकात दुसऱ्या देशाकडून खेळणारे भारतीय वंशाचे क्रिकेटपटू
कोण आहे सौरभ नेत्रावळकर? सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानला चारली धूळ, लिंकडीन प्रोफाईलचा स्क्रिन शॅाट व्हायरल
पाकिस्तानची नाचक्की! सुपर ओव्हरमध्ये महाराष्ट्राच्या पोराकडून चारीमुंड्या चीत, इतिहासातील सर्वात वाईट पराभव

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---