आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 11वा सामना आज (6 जून) रोजी पाकिस्तान विरुद्ध अमेरिका यांच्यामध्ये खेळला जात आहे. हा सामना ग्रँड प्रेरी स्टेडियमवर रंगला आहे. पाकिस्तान संघ यंदाच्या टी20 विश्वचषकातील पहिलाच सामना खेळत आहे, तर यजमान अमेरिका या विश्वचषकातील दुसरा सामना खेळत आहेत. यादरम्यानं प्रथम फलंदाजी करत असताना पाकिस्ताननं अमेरिकेसमोर 160 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
अमेरिकेनं टाॅस जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमनं (Babar Azam) 43 चेंडूत सर्वाधिक 44 धावा केल्या. यादरम्यान त्यानं 4 चौकारांसह 2 षटकार ठोकले. तर संघाचा अष्टपैलू खेळाडू शादाब खाननं (Shadab Khan) 25 चेंडूत 40 धावा ठोकल्या. यादरम्यान त्यानं उत्तुंग चार षटकार लगावले. नॉथुश केंजिगेनं अमेरिकेसाठी 3 बळी घेतले तर सौरभ नेत्रावलकरनं 2 बळी घेत संघाला मोलाचं योगदान दिलं.
पाकिस्ताननं मर्यादित 20 षटकात 7 विकेट्स गमावून अमेरिकेसमोर 159 धावा केल्या आणि अमेरिका संघ या धावांचा कशा प्रकारे पाठलाग करतो हे पाहणंदेखील महत्त्वाचं ठरणार आहे. कारण अमेरिकेनं पहिल्याच सामन्यात कॅनडाविरुद्ध धावांचा पाठलाग आक्रमक अंदाजात केला होता. पाकिस्तान संघ अमेरिकेसमोर आक्रमक अंदाजात खेळण्याच्या शैलीत अयशस्वी राहिला.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
पाकिस्तान- बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), उस्मान खान, फखर झमान, आझम खान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, मोहम्मद अमीर, हरिस रौफ
युनायटेड स्टेट्स अमेरिका- स्टीव्हन टेलर, मोनांक पटेल (कर्णधार/यष्टीरक्षक), अँड्रिज गॉस, आरोन जोन्स, नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, जसदीप सिंग, नॉथुश केंजिगे, सौरभ नेत्रावलकर, अली खान
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानच्या माजी कर्णधारानं केलं, भारतीय संघाबद्दल मोठं वक्तव्य!
अमेरिकेनं जिंकला टाॅस; प्रथम गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
आयपीएल 2024 मध्ये फ्लाॅप, टीम इंडीया मध्ये येताच परतला फाॅर्म!