---Advertisement---

‘वेगाचा बादशहा’ उसेन बोल्टलाही लागले आयपीएलचे वेध! आरसीबीच्या जर्सीतील फोटो शेअर करत दिला ‘हा’ संदेश

---Advertisement---

जमैकाचा वेगवान धावपटू उसैन बोल्ट यंदाच्या 9 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या 14 व्या आयपीएल मोसमात विराट कोहली कर्णधार असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला समर्थन देताना दिसणार आहे. त्याने बुधवारी (7 एप्रिल) या दिवशी आरसीबीची जर्सी घातलेला स्वत:चा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

यंदाच्या आयपीएल सत्रामध्ये आरसीबी संघ 9 एप्रिल रोजी गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध आपल्या मोहिमेला प्रारंभ करणार आहे. तत्पुर्वी वेगवान धावपटू बोल्टने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सला टॅग करत लिहिले आहे की, “चॅलेंजर्स, मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी अजूनही एक वेगवान धावपटू आहे.”

https://twitter.com/usainbolt/status/1379797794135887873

यावरती विराट कोहलीने प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, “याबद्दल काहीही शंका नाही. त्यामुळेच आता आम्ही तुम्हाला आमच्या संघात सामील केले आहे.”

https://twitter.com/imVkohli/status/1379822254767280131

आरसीबी संघाने आतापर्यंत एकही आयपीएल चषक मिळवले नसून अद्यापही ते कोहलीच्या नेतृत्वाखाली विजेता होण्याची वाट पाहत आहेत.

यंदाच्या मोसमात आरसाबी संघाने ग्लेन मॅक्सवेलला आपल्या ताफ्यात सामील करून संघाची फलंदाजी मजबूत केली आहे. तसेच त्यांच्याकडे कोहली, एबी डिव्हिलियर्ससारखे दिग्गज फलंदाजही आहेत. तसेच युवा सलामीवीर देवदत्त पडीक्कलही एकहाती सामना फिरवू शकतो.

एबी डिव्हिलियर्सने बोल्टच्या ट्वीटला उत्तर देताना लिहिले आहे की, “आम्हाला जेव्हा अतिरिक्त धावांची गरज भासेल, तेव्हा कोणाला बोलवायचे हे आम्हाला माहित आहे.”

https://twitter.com/ABdeVilliers17/status/1379804444028624897

या हंगामात विराटला मोठे विक्रम करण्याची संधी 

टी20 क्रिकेटमध्ये विराट 10,000 धावांपासून पासून फक्त 269 धावा दूर आहे. तर तसेच आयपीएल मधील 8 सामने खेळल्यानंतर तो आयपीएलमध्ये 200 सामने खेळण्याचा टप्पा गाठेल.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएल २०२१: ‘ऑरेंज आर्मी’ची पहिली भिडंत केकेआरविरुद्ध, पाहा त्यांचे संपूर्ण वेळापत्रक

बापरे! वयाच्या १३ व्या वर्षी मोईन अलीला जीवे मारण्याचा झाला होता प्रयत्न? वाचा काय आहे कहाणी

आयपीएल २०२१ हंगामत कोहलीचे दिसणार ‘विराट’ रुप? ‘हे’ ३ मोठे विक्रम करण्यास सज्ज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---