एका खेळातून निवृत्त होऊन दुसऱ्या क्रिडा क्षेत्राकडे वळणे हे जरी अवघड असले तरी जगातील सर्वोत्तम धावपटू उसेन बोल्टने असे केले आहे. धावपटू म्हणून नावजलेला बोल्ट वयाच्या 32व्या वर्षी फुटबॉलकडे वळाला.
बोल्टने ऑस्ट्रेलियाच्या ए-लीगमध्ये सेंट्रल कोस्ट मरिनर्स क्लबकडून पदार्पण करताना एका सामन्यातच दोन गोल केले. मात्र आता त्याने मरिनर्स क्लबशी करारबद्ध होण्यास नकार दिला आहे. अनिश्चित सराव काळ हे त्याचे क्लब सोडण्याचे मुख्य कारण आहे.
ए लीगमध्ये बोल्टने मॅकार्थर साउथ वेस्ट युनायटेड विरुद्ध हे 2 गोल केले होते . हा सामना मरिनर्सने 4-0 असा जिंकला होता. तसेच काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियन फुटबॉल फेडरेशनकडून त्याच्यावर डोपिंग चाचणी करण्याचा दबाब आणला जात होता. या गोष्टीमुळेही तो नाराज होता.
“या क्लबचे मालक, सहाय्यक कर्मचारी या सगळ्यांचे मी आभार मानतो. तसेच हा क्लब यशस्वी व्हावा हीच अपेक्षा आहे”, असे बोल्ट म्हणाला.
“ऑलिंपिक चॅम्पियन बोल्ट हा आमच्या क्लबसोबत 8 आठवडे खेळला याचे आश्चर्य आहे. पण तो भविष्यात सेंट्रल कोस्ट मरिनर्सकडून खेळणार याचा करार आम्ही करू शकलो नाही याचे वाईट वाटते”, असे मरिनर्सचे मालकी हक्क असलेले माईक चार्लवर्थ म्हणाले.
We wish @usainbolt all the best in his future endeavours and thank him for being a part of the Mariners Family.
BREAKING NEWS: Usain Bolt Update ⚡️https://t.co/Lfi4ccmcMA#CCMFC #ALeague pic.twitter.com/Th1y8sjrvI
— Central Coast Mariners (@CCMariners) November 2, 2018
8 वेळचा ऑलंपिक सुवर्ण पदक विजेता असणाऱ्या बोल्टने मरिनर्समध्ये येण्याअगोदर काही युरोपियन फुटबॉल क्लबसाठी ट्रायल दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या:
–धोनीबरोबरच टी२० खेळत नसलेला खेळाडू म्हणतोय, धोनी संघाचा अविभाज्य भाग आहे
–विराटचं ठीक आहे, बाकी खेळाडूंची आयसीसी क्रमवारी नक्की पहा