आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक येत्या शनिवारपासून अर्थात २४ जून रोजी सुरुवात होत असून आयसीसीने प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकानुसार विश्वचषक विजेत्या टीमला मोठी रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे.
आयसीसी प्रसिद्धी पत्रकानुसार विजेत्या संघाला ६६०,००० अमेरिकी डॉलर तर अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला ३३०,००० अमेरिकी डॉलर मिळणार आहे.
२४ जून ते २३ जुलै या काळात इंग्लंडमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत आयसीसी क्रमवारीत पहिल्या ८ क्रमांकावर असलेले संघ भाग घेत आहेत.
या स्पर्धेसाठी एकूण बक्षिसांची रक्कम ही तब्बल २ मिलियन अमेरिकी डॉलर एवढी असून २०१३ पेक्षा ही १०पट जास्त आहे.
उपांत्यफेरीत पराभूत होणाऱ्या संघांना १६५,००० अमेरिकी डॉलर मिळणार असून साखळी फेरीतून बाहेर पडणाऱ्या संघांना ३०,००० अमेरिकी डॉलर तर साखळी फेरीत प्रत्येक विजयला २०,००० अमेरिकी डॉलर मिळणार आहे.
मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २४जून रोजी यजमान इंग्लंडविरुद्ध, २९जून रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध, ०२ जुलै रोजी पाकिस्तानविरुद्ध, ०५ जून रोजी श्रीलनकेविरुद्ध, ०८ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, १२ जुलै रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध, १५ जुलै रोजी न्युझीलँडविरुद्ध असे एकूण ७ साखळीचे सामने खेळत आहे.