ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ऍशेस 2023चा पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना केविंगटन ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या डावात डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात मिळवून दिली. दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी वैयक्तिक अर्धशतके केली असून उस्मान ख्वाजाचे नाव एका खास यादीत सामील झाले.
ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या डावात उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याने 110 चेंडूत अर्धशतक केले. तसेच डेविड वॉर्नर (David Warner) याने 90 चेंडूत अर्धशतक केले. ऑस्ट्रेलियाला शेवटच्या डावात 384 धावांचे लक्ष्य मिळाले असून या दोघांनी संघाला जबरदस्त सुरुवात मिळाली. यादरम्यानच ख्वाजाने 5000 कसोटी धावा पूर्ण केल्या. सोबत ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्यांच्या यादीत 21व्या क्रमांक भक्कम केला.
ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्यांच्या यादीत रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. पाँटिंगने 168 सामन्यांमध्ये 13378 धावा केल्या आहेत. यादरम्यान पाँटिंगने 41 शतक आणि 62 व्या क्रमांकावर होता. यादीत दुसऱ्या क्रमांकावर ऍलन बॉर्डर (Allen Border) यांचे नाव आहे. बॉर्डर यांनी 156 कसोटी सामन्यांमध्ये 11174 धावा केल्या. यात 27 शतक आणि 63 अर्धशतकांचा समावेश आहे. तिसऱ्या क्रमांकावर स्टीव वॉ (Steve Waugh) आहेत, ज्यांनी 168 सामन्यांमध्ये 10927 धावा केल्या आहेत. सथ्या ऑस्ट्रेलियन संघाचे प्रतिनिधित्व करणारा एकमेव खेळाडू पहिल्या पाचमध्ये आहेत. हा खेळाडू म्हणजे स्टीव स्मिथ (Steve Smith), जो या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. स्मिथने 102 सामन्यांमध्ये32 शतक आणि 38 अर्धशतकांच्या मदतीने 9266 धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक कसोटी धावा करणारे चार फलंदाज
रिकी पाँटिंग – 13378
ऍलन बॉर्डर – 11174
स्टीव वॉ – 10927
स्टीव स्मिथ – 9266
दरम्यान, उभय संघांतील या शेवटच्या ऍशेस कसोटीचा विचार केला, तर दोन्ही संघांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. पहिल्या डावात इंग्लंडने 283, तर ऑस्ट्रेलियाने 295 धावा केली. सामन्यातील दुसर्या डावात इंग्लंडने 395 धावा केल्या असून ख्वाजा आणि वॉर्नरने देखील आपल्या संघाला चांगली सुरुवात दिली आहे. चौथ्या दिवशी दुसऱ्या सत्रानंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या एकही विकेट न गमावता 135 पर्यंत पोहोचली होती. (Usman Khawaja becomes the 21st Australian to complete 5000 Test runs.)
महत्वाच्या बातम्या –
कारकिर्दीतील शेवटच्या चेंडूवर ब्रॉडने मारला गगनचुंबी षटकार, व्हिडिओ पाहून फिरतील तुमचेही डोळे
मोठी बातमी: पुन्हा भारताबाहेर होणार आयपीएल? बीसीसीआय झाली हतबल