---Advertisement---

यजमान ऑस्ट्रेलिया सिडनी कसोटीत फ्रंटफूटवर; पुनरागमनात ख्वाजाचे दणदणीत शतक

On: गुरूवार, जानेवारी 6, 2022 3:33 PM
usman-khawaja
---Advertisement---

जगातील सर्वात प्रतिष्ठित कसोटी मालिका असलेल्या ऍशेस (Ashes 2021-2022) मालिकेतील चौथा सामना सिडनी येथे सुरू आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी यजमान ऑस्ट्रेलियासाठी पुनरागमन करणारा मधल्या फळीतील फलंदाज उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) नायक ठरला. तब्बल १६ महिन्यांनंतर कसोटी संघात पुनरागमन करताना त्याने एक अप्रतिम शतक झळकावले. त्याच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव घोषित करत सामन्यात काही प्रमाणात आघाडी मिळवली. (AUSvENG)

मालिकेतील पहिले तीन सामने जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाकडे विजयी आघाडी आहे. त्यानंतर, चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही यजमान फलंदाजांनी इंग्लंडला गोलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडले. पहिल्या दिवशीच्या ३ बाद १२६ वरून दुसऱ्या दिवशी खेळाला सुरुवात झाली. अनुभवी स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) व उस्मान ख्वाजा यांनी दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. स्मिथ याने आपला अप्रतिम फॉर्म कायम राखत शानदार अर्धशतक झळकावले. तो ६७ धावा काढून बाद झाला. मात्र, ट्रेविस हेड कोरोना पॉझिटिव्ह (Travis Head Covid Positive) आल्याने अचानकपणे संधी मिळालेल्या उस्मान ख्वाजा याने या संधीचे सोने केले. त्याने इंग्लंडच्या अनुभवी गोलंदाजांचा समाचार घेत शानदार शतक झळकावले. पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क व नॅथन लायन यांच्या उपयुक्त योगदानाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ४१६ धावांवर आपला डाव घोषित केला. ख्वाजाने सर्वोच्च १३७ धावांची खेळी केली. तर, इंग्लंडसाठी स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad Fifer) याने पाच बळी आपल्या नावे केले.

इंग्लंडची सावध सुरवात
दिवसातील उर्वरित पाच षटके खेळून काढण्याची मोठी जबाबदारी इंग्लंडच्या फलंदाजांवर होती. हसीब हमीद यांनी कोणतीही जोखीम न घेता पाच षटकात बिनबाद १३ धावा बनविल्या.

ऑस्ट्रेलियाकडे विजयी आघाडी
प्रतिष्ठित ऍशेस मालिकेतील पहिले तिन्ही सामने यजमान ऑस्ट्रेलियाने एकतर्फी जिंकली आहेत. ब्रिस्बेन कसोटीत ९ गड्यांनी ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. त्यानंतर, ऍडलेड येथील दिवस रात्र कसोटीत (Adelaide Day-Night Test) ऑस्ट्रेलियाने तब्बल १७२ धावांनी विजय साजरा केलेला. मेलबर्न येथील बॉक्सिंग डे कसोटीतही (Boxing Day Test) ऑस्ट्रेलियाने इंग्लंडने डावाने पराभूत करत ऍशेस आपल्याकडे राखली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

झुलन गोस्वामीच्या भूमीकेत अनुष्का शर्माचा जलवा! ‘चकदा एक्सप्रेस’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित (mahasports.in)

पंतशी पंगा, मग होणार दंगा! एडेन मार्करमच्या स्लेजिंगला रिषभचे सडेतोड उत्तर, पाहा व्हिडिओ (mahasports.in)

SAvsIND, 2nd Test, Live: चौथ्या दिवशी पावसाचा अडथळा; खेळ सुरू होण्यास विलंब (mahasports.in)

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---