---Advertisement---

सिडनीमध्ये कसोटीत लागोपाठ तीन शतके करणारा ख्वाजा केवळ चौथाच खेळाडू, यादीत एका भारतीयाचाही समावेश

On: गुरूवार, जानेवारी 5, 2023 11:24 AM
Usman Khawaja
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मालिकेतील शेवटचा आणि तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (एससीजी) सुरू असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सलामीवीर उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याने शतकी खेळी करत मोठा इतिहास रचला आहे.

ख्वाजाचे हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 13वे तर सिडनीमधील तिसरे शतक ठरले आहे. त्याने कगिसो रबाडा याच्या गोलंदाजीवर दोन धावा घेत शतक पूर्ण केले. या शतकानंतर हा डाव्या हाताच्या फलंदाज सिडनीमध्ये कसोटीत खेळताना लागोपाठ तीन शतकी खेळी करणारा चौथा खेळाडू ठरला आहे. याआधी त्याने मागील वर्षी झालेल्या ऍशेस मालिकेत याच मैदानावर दोन शतक केले होते.

त्याचबरोबर एससीजीवर कसोटीमध्ये लागोपाठ तीन शतके करणारा ख्वाजा चौथा तर ऑस्ट्रेलियाचा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्यामध्ये एका भारतीय आणि इंग्लंडच्या खेळाडूचा देखील समावेश आहे. सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून वॅली हॅमंड (Wally Hammond) आणि इंग्लंडकडून (Doug Walters) या दोघांनी तर भारताकडून व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी कसोटीत लागोपाठ तीन शतके केली आहेत.

ख्वाजा जवळपास अडीच वर्षानंतर ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात परतला. त्यानंतर त्याने सिडनीमध्ये पुनरागमनाचा सामना खेळताना शतकाने सुरूवात केली आणि 12 महिन्यांतच 5 शतकेही केली. त्याने 2022मध्ये उत्तम कामगिरी केली त्यामुळे त्याची आयसीसी पुरूष कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर 2022 या पुरस्कारासाठी निवड झाली.

ख्वाजाने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 11 सामन्यात 67.50च्या सरासरीने 1080 धावा केल्या आहेत. या पुरस्कारासाठी रबाडा, बेन स्टोक्स आणि जॉनी बेयरस्टो यानांही नामांकने मिळाली आहेत.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रापर्यंत 472 धावसंख्येवर 4 विकेट्स गमावल्या होत्या. मार्नस लॅब्यूशेन 79 आणि स्टीव्ह स्मिथ 104 धावा करत बाद झाले. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमान ऑस्ट्रेलिया 2-0 असा विजयी आघाडीवर आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुण्यातही भारत-श्रीलंका यांच्यात पाहायला मिळणार काट्याची टक्कर! मागील सामन्यांचे निकालच धक्कादायक
जेव्हा रवी शास्त्रींनी सिडनीत 9 तास फलंदाजी करत साकारली होती द्विशतकी खेळी, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---