---Advertisement---

एकेकाळी ज्याच्याबरोबर झाला होता वाद, आज तोच खेळाडू उतरला जस्टीन लँगरच्या समर्थनार्थ

Justin-Langer
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगरला गेल्या काही काळापासून अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लँगर आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू यांच्यात गेल्या काही काळापासून वाद चालू आहेत. काही दिवसांपूर्वीच या वादाचे कारण देखील समोर आले होते. ज्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर खूप निराश झाले होते.

यादरम्यान, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू उस्मान ख्वाजाने प्रशिक्षकाचे समर्थन केले आहे. उस्मान ख्वाजाच्या मते, लँगरला ऍशेस मालिकेपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षक पदावर कायम ठेवण्याची मागणी केली आहे. प्रशिक्षक लँगरचा कठोर स्वभाव आणि खेळाडूंसोबत वागण्यातील बदल हे ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आवडले नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू प्रशिक्षक बदलण्याची मागणी करत आहे.

तसेच, २०१८ साली यूएईमध्ये काही कारणामुळे जस्टिन लँगरसोबत उस्मान ख्वाजाचा वाद झाला होता. मात्र, तोच आता जस्टिन लँगरच्या समर्थनात उतरला आहे. त्याच्या मते, खेळाडूंनी माध्यमांमध्ये येऊन तक्रार करण्यापेक्षा आपल्या खेळण्यावर लक्ष दिले पाहिजे.

याबाबत बोलताना त्याच्या यूट्यूब चॅनलवर ख्वाजा म्हणाला, “तुम्हाला काय वाटते, जस्टिन लँगरला याबाबतीत कसे वाटत असेल? कदाचित त्याला असे वाटत असेल की, सर्व खेळाडू त्याच्या पाठीमागून खंजीर भोकसत आहेत आणि असे वाटते देखील.”

“त्यामुळे ते एवढे निराश आहे. खरे पाहायला गेले, तर ही खूप वाईट गोष्ट आहे. त्यामुळे याबाबतीत खेळाडूंनी हे लवकरात लवकर मिटवले पाहिजे. नेहमी प्रशिक्षकच १००% चुकीचा असतो असे नाही. खेळाडूंच्या प्रदर्शनात देखील कमतरता राहते. त्यामुळे खेळाडूंनी याची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. यासाठी खेळाडूंनी चांगले प्रदर्शन करणे देखील गरजेचे आहे. हे केवळ एका व्यक्तीबाबत नाहीये. त्यामुळे या गोष्टीवर आता विचार झाला पाहिजे,” असेही पुढे बोलताना ख्वाजा म्हणाला.

दरम्यान, टी-२० विश्वचषक स्पर्धेतसाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहे. यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने त्यांच्या १५ सदस्यीय संघ देखील जाहीर केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –
पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये अशी राहिली आहे भारताची कामगिरी, ऍथलेटिक्समध्ये मिळाली आहेत १० पदके
भारताविरुद्धच्या लीड्स कसोटीसाठी जो रूटची जय्यत तयारी, पाहा व्हिडिओ
“मला वाटले नव्हते की, जो रूट विराटच्या पुढे जाईल”, कोहलीच्या प्रशिक्षकानेच व्यक्त केले आश्चर्य

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---