इंग्लंड विरुद्ध भारत संघात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेत पहिल्या दोन सामन्यांनंतर भारत १-० अशा फरकाने आघाडीवर आहे. आता तिसरा सामना हेडिंग्ले येथील लीड्स मैदानावर २५ ऑगस्टपासून सुरु होईल. हा सामना सुरु होण्यापूर्वीच इंग्लंडचा कर्णधार क्षेत्ररक्षणाचा सराव करताना दिसला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
रूटचा क्षेत्ररक्षणाचा सराव
नॉटिंघम व लॉर्ड्स कसोटीत आपल्या फलंदाजीने इंग्लंड संघाला एकहाती तारणारा कर्णधार जो रूट तिसरी कसोटी सुरू होण्यापूर्वी लीड्सवर क्षेत्ररक्षणाचा सराव करताना दिसला. इंग्लंड क्रिकेटने आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रूट झेलांचा सराव करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने काही अप्रतिम झेल घेतलेले दिसतात.
Oof @root66 ???????? pic.twitter.com/Pa5iqIceAZ
— England Cricket (@englandcricket) August 23, 2021
जबरदस्त फॉर्ममध्ये आहे रूट
जो रूट भारताविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत शानदार फॉर्ममध्ये दिसत आहे. नॉटिंघम कसोटीत त्याने पहिल्या डावात ६१ तर दुसर्या डावात शतकी खेळी केली. लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावातही त्याने १८० धावांची नाबाद शतकी खेळी केली होती. तिसऱ्या कसोटीतही इंग्लंडला त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.
तिसऱ्या सामन्यापूर्वी इंग्लंडला धक्का
लीड्स कसोटी सुरु होण्याच्या दोन दिवस आधीच इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज मार्क वूड हा उजव्या खांद्याच्या दुखापतीमुळे तिसऱ्या कसोटीतून बाहेर पडला. त्याचा १५ सदस्यीय संघात समावेश केला गेला होता. मात्र, त्याच्या तंदुरुस्तीवर त्याची निवड केली जाणार होती. यापूर्वीच स्टुअर्ट ब्रॉड पायाच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे.
तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ-
जो रुट (कर्णधार), रॉरी बर्न्स, हसीब हमीद, डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन, सॅम करन, डॅन लॉरेन्स, साकीब मेहमूद, मोईन अली, क्रेग ओव्हरटन.
महत्त्वाच्या बातम्या-
“मला वाटले नव्हते की, जो रूट विराटच्या पुढे जाईल”, कोहलीच्या प्रशिक्षकानेच व्यक्त केले आश्चर्य
“विराटसेना जुन्या भारतीय संघासारखी नाही, ज्यांना कोणीही डिवचू शकत होते”