---Advertisement---

‘इंग्लंडमध्ये खेळणं म्हणजे जुगारासारखे’, डब्ल्यूटीसीबी फायनलआधी घाबरला ऑस्ट्रेलियन सलामीवीर!

Usman Khawaja David Warner
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा याच्या मते इंग्लंडमध्ये खेळताना सलामीवीर फलंदाजांना अडचणीचा सामना करावा लागतो. इंग्लंडच्या द ओव्हरल स्टेडियमवर 7 ते 11 जूनदरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ भिडणार आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा हा अंतिम सामना असून उस्मान ख्वाजाला या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी चांगली सुरुवात द्यावी लागेल. असे असले तरी, इंग्लंडमधील त्याची आकडेवारी मात्र समाधानकारक राहिली नाहीये.

उस्मान ख्वाजाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी मत व्यक्त केले. त्याच्या मते इंग्लंडमध्ये कोणत्याही संघाच्या वरच्या फळीतील फलंदाजांसाठी धावा करणे सोपे नसते. यावर खेळाडंकडे एकमात्र पर्याय आहो तो अधिकची मेहनत करणे आणि स्वतःकडून कमी अपेक्षा ठेवणे. उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) स्वतः देखील इंग्लंडच्या परिस्थितीत धावा करण्यासाठी नेहमीच झगडताना दिसला आहे. त्याने इंग्लंडमध्ये खेळलेल्या 6 कसोटी सामन्यांमद्ये 19.66च्या सरासरीने धावा केल्या आहेत. असे असले तरी, ख्वाजा सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात त्याने इंग्लंडच्या कसोटी संघात पुनरागमन केले. त्यानंतर खेळलेल्या 16 कसोटींमध्ये 69.91च्या सरासरीने 1608 धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठीचा अंतिम सामना आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची ऍशेस मालिकाही खेळायची आहे. भारताविरुद्धचा एकमात्र सामना आणि त्यानंतरची ऍशेस मालिका ही इंग्लंडमध्येच होणार असल्याने ख्वाजा चिंतेत आहे. ऍशेस मालिकेतील (The Ashes Series) पहिला सामना 16 जूनपासून बर्मिंघममध्ये सुरू होणार आहे. याविषयी ख्वाजा म्हणाला, “माझ्या मते पहिल्या तीन फलंदाजांसाठी इंग्लंड सर्वात अवघड ठिकाण आहे. इ्ंग्लंडच्या परिस्थितीत नवीन चेंडूचा सामना करणे सोपे नसते. कधी-कधी त्याठिकाणीही परिस्थिती आपल्यासाठी अनुकूल असते, पण यासाठी नशिबाची साथ आवश्यक आहे. कारण अनेकदा विरोधी संघ सर्वबाद झाल्यानंतर आकाशात झग दाटतात, तर कधी ऊन पडलेले असते.”

ख्वाज्याने म्हटल्याप्रमाणे हवामानात बदल होत असल्याने याठिकणी फलंदाजी करणे जुगार खेळण्यासारखे आहे. तो म्हणाला, “मला एवढेच समजले की, मेहतन करा आणि तुम्ही इंग्लंडच्या दौऱ्यावर असाल तर स्वतःकडून खूप कमी अपेक्षा ठेवा. एका वेळी एकाच सामन्यावर लक्ष द्या. कारण एक फलंदाज म्हणून तुम्ही अपयशीही होऊ शकता. कारण एक फलंदाज म्हणून तुम्ही चांगली धावसंख्या केली, तर जितका होऊ शकेल, तितका फायदा घेतला पाहिजे.” (Usman Khawchi’s reaction to England’s situation ahead of WTC final)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्ले-ऑफच्या शर्यतीतून हैदराबाद बाहेर, पराभवानंतर मार्करमने वाचला चुकांचा पाढा; म्हणाला…
गिलने शतक ठोकताच विराटची सर्वात मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘पुढे जा आणि नव्या पिढीचे…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---